मात्र करीना रुग्णालयात का गेली होती याचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही. प्रसिद्ध फोटोग्राफर विरल भयानी यांनी आपल्या कॅमेरात करीनाच्या कारला कैद केलं आहे. मात्र कारच्या काचा काळ्या रंगाच्या असल्याने करीनाला पाहता आलं नाही. मात्र करीनाच्या कारला रुग्णालयाच्या बाहेर पाहून असा अंदाज लावला जात आहे, की कोरोना लस घेण्यासाठी किंवा हेल्थ चेकअप करण्यासाठी करीना आलेली असेल. (हे वाचा:‘अरिजीत सिंहच्या आईची प्रकृती गंभीर; सुपरस्टार अभिनेत्री करतेय रक्ताची मागणी ) रणधीर कपूर ज्येष्ठ अभिनेता राज कपूर यांचा मोठा मुलगा आहे. रणधीर कपूर यांनी म्हटलं आहे, की ते मुंबई मधील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचार घेत आहेत. ते गेल्या काही दिवसांपासून ICU मध्ये दाखल होते. मात्र आत्ता त्यांना बरं वाटत असल्याचं यांनी म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी म्हटलं होतं की त्यांना लवकरच रुग्नालायातून घरी पाठवण्यात येईल. तसेच त्यांनी म्हटलं होतं, रुग्णालयात मला ऑक्सिजनची आवश्यकता भासली नाही. त्यांना फक्त ताप होता. त्यामुळे आत्ता त्यांची प्रकृती चांगली आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actress, Kareena Kapoor, Marathi entertainment, Mumbai