मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Shilpa-Raj Wedding Anniversary: लग्नाच्या वाढदिवशी शिल्पा शेट्टीची राजसाठी स्पेशल पोस्ट

Shilpa-Raj Wedding Anniversary: लग्नाच्या वाढदिवशी शिल्पा शेट्टीची राजसाठी स्पेशल पोस्ट

Shilpa-Raj Wedding Anniversary

Shilpa-Raj Wedding Anniversary

बी टाउनची अभिनेत्री शिल्पा शेट्टी(Shilpa-Raj Wedding Anniversary) आपल्या लग्नाचे 12 वे वर्ष साजरे करत आहे.

  • Published by:  Dhanshri Otari

मुंबई, 22 नोव्हेंबर: गेल्या काही दिलसांपासून अनेक अडचणींना अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि राज कुंद्रा(Raj Kundra ) यांना सामोरे जावे लागले. आज ही बी टाउनची अभिनेत्री शिल्पा आपल्या लग्नाचे 12 वे वर्ष साजरे करत आहे. शिल्पाने 2009 मध्ये बिझनेसमन राज कुंद्रासोबत लग्न केले होते. त्यांच्या लग्नाला आज 12 वर्ष पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्त शिल्पाने राजसाठी स्पेशल पोस्ट केली आहे. जी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शिल्पाने लग्नाच्या फोटोंचा कोलाज शेअर करत, मोठीच्या मोठी पोस्ट लिहीली आहे.

काय म्हटले आहे शिल्पाने पोस्टमध्ये?

‘या क्षणी आणि 12 वर्षांपूर्वी आपण एकमेकांना वचन दिलं होतं आणि ते आजही पूर्ण करतोय. एकमेकांसोबत आनंदी क्षण घालवण्याचे, कठीण काळात एकमेकांची सोबत देण्याचे, प्रेमावर आणि परमेश्वरावर विश्वास ठेवण्याचे वचन आपण सोबत निभवणार आहोत. 12 वर्षे आणि आणखी किती ते मी मोजू शकत नाही. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा..कुकी! इथे आनंद आहे, अनेक मैलाचे दगड आहेत, शिवाय आपली बहुमोल संपत्ती म्हणजेच आपली मुलं आहेत. आमच्या चांगल्या आणि वाईट काळात साथ देणाºया सर्व शुभचिंतकांचे मनापासून आभार.’

काही दिवसांपूर्वी राजला भोगावी लागली होती तुरुंगाची शिक्षा

पती राज कुंद्रा (Raj Kundra )पोर्नोग्राफी प्रकरणी तुरूंगात गेला होता.19 जुलै रोजी राज कुंद्राला मुंबई पोलिसांनी अटक केली होती. दोन महिन्यांनंतर मुंबई न्यायालयाने राजला 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. जामिनावर सुटल्यापासून राज सोशल मीडियापासून दूर आहे. त्याने त्याचे अकाऊंट्ससुद्धा डिलीट केले आहेत.

त्यानंतर सोशल मीडीयावर शिल्पा राजला घटस्फोट देणार असल्याची चर्चाही रंगली होती.

First published:

Tags: Entertainment, Raj kundra, Shilpa shetty