मुंबई, 04 एप्रिल: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी पती राज कुंद्रा मुळे कायम चर्चेत असते. पण तिचं स्वतःच आयुष्य देखील कायम विवादित राहील आहे. शिल्पा शेट्टी सोबत भर स्टेजवर घडलेला एक किस्सा आजही कायम चर्चेत असतो. तो म्हणजे प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता रिचर्ड गेरे याने 2007 मध्ये राजस्थानमधील एका कार्यक्रमादरम्यान सार्वजनिकपणे शिल्पा शेट्टीचं चुंबन घेतलं होतं. या प्रकाराने सगळेच चकित झाले होते. तेव्हा अभिनेत्रीचे अनेक फोटो देखील व्हायरल झाले होते. या प्रकरणी शिल्पा शेट्टीच्या विरोधात अश्लिलतेचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या प्रकरणीच कोर्टाने मोठा निर्णय सुनावला आहे. शिल्पा शेट्टीला मुंबई सत्र न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. हॉलिवूड अभिनेता रिचर्ड गेरेने 2007 मध्ये एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान सगळ्यांसमोरच शिल्पा शेट्टीला ‘किस’ केले होते. यानंतर अभिनेत्रीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण तेव्हा चांगलंच तापलं होतं. या प्रकरणी महानगर दंडाधिकारी कोर्टाने शिल्पाला दिलासा दिलेला. पण महानगर दंडाधिकारी कोर्टाच्या निकाला विरोधात मुंबई सत्र न्यायालयात पुनरीक्षण याचिका दाखल करण्यात आलेली. या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने अखेर आज महत्त्वाचा निर्णय दिला आहे. Leander Paes Kim Sharma: ‘या’ स्टार खेळाडूच्या प्रेमात वेडी होती अभिनेत्री; 2 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर तुटलं नातं? या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने आज महानगर दंडाधिकारी कोर्टाचा दिलेला आदेश कायम ठेवला आहे. त्यामुळे शिल्पा शेट्टीसाठी हा मोठा दिलासा मिळाल्याचं मानलं जात आहे. सत्र न्यायाधीश एससी जाधव यांनी न्यायदंडाधिकार्यांच्या आदेशाला आव्हान देणारा महाराष्ट्र राज्याने दाखल केलेला पुनरीक्षण अर्ज फेटाळला आहे. मुंबईतील बॅलार्ड पिअर येथील महानगर दंडाधिकारी मॅजिस्ट्रेट केतकी चव्हाण यांनी जानेवारी 2022 मध्ये शेट्टीला दोषमुक्त केले होते. मात्र त्या निर्णयाला राज्य सरकारतर्फे मुंबई सत्र न्यायालयात पुनरीक्षण अर्ज दाखल करण्यात आला होता.
राजस्थानात 2017 साली एड्स जागरुकता कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याच कार्यक्रमात ही घटना घडली होती. सार्वजनिक कार्यक्रमात अश्लील आणि असभ्य वर्तन केल्याप्रकरणी शिल्पा हिच्यावर जयपूर, अलवर आणि गाझियाबाद येथे फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले. राजस्थान न्यायालयाने शिल्पा आणि गेअरविरोधात अटक वॉरंटही काढले होते. तेव्हा या घटनेवर तसेच शिल्पा शेट्टीवर टीका करण्यात आली होती.
काहींनी संबंधित प्रकार हा अश्लील असून देशाच्या संस्कृतीचा अपमान करणारा असल्याचा आरोप केला होता. तसंच शिल्पा शेट्टीवर देखील अनेक आरोप करण्यात आले होते. राजस्थानात या प्रकरणी अभिनेत्रीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर कोर्टाच्या आदेशान्वये हे प्रकरण मुंबईत स्थलांतरीत करण्यात आलं होतं. या प्रकरणी मॅजिस्ट्रेट कोर्टाने जानेवारी 2022 मध्ये शिल्पा शेट्टीला आरोपमुक्त केलं होतं. या प्रकरणात गेरेने केलेल्या कृत्यात ती पीडिता असल्याचं म्हटलं गेलं होतं. पण त्यानंतर मुंबई सेशन्स कोर्टात या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली होती. पण आता अभिनेत्रीला दिलासा मिळाला आहे.