जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / पायाला दुखापत झाली असतानाही शिल्पा ‘हे’ काय करतेय? पाहा हा व्हिडिओ

पायाला दुखापत झाली असतानाही शिल्पा ‘हे’ काय करतेय? पाहा हा व्हिडिओ

शिल्पा शेट्टी

शिल्पा शेट्टी

अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या सौंदर्याप्रमाणेच ती फिटनेससाठीही ओळखली जाते. स्वतःचा फिटनेस जपण्यासाठी ती नियमित व्यायाम करते व त्याचे व्हिडिओही सातत्यानं पोस्ट करत असते. असाच एक व्हिडिओ तिनं पोस्ट केलाय.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 17 फेब्रुवारी :  बॉलिवूडमधल्या कलाकारांना त्यांचा फिटनेस नेहमीच सांभाळावा लागतो. एखाद्या सिनेमासाठी तात्पुरतं वजन वाढवणं किंवा कमी करणं हे त्यांच्यासाठी नवीन नाही. त्यामुळेच हे कलाकार फिटनेस फ्रीक असतात. अनेक जण तर सोशल मीडियावर त्यांच्या फिटनेसबाबत नेहमी पोस्ट करत असतात. त्यापैकी एक म्हणजे अभिनेत्री शिल्पा शेट्टी. तिच्या सौंदर्याप्रमाणेच ती फिटनेससाठीही ओळखली जाते. शिडशिडीत बांध्याची शिल्पा सगळ्यांची ‘हॉट फेव्हरेट’ आहे. स्वतःचा फिटनेस जपण्यासाठी ती नियमित व्यायाम करते व त्याचे व्हिडिओही सातत्यानं पोस्ट करत असते. असाच एक व्हिडिओ तिनं पोस्ट केलाय. ‘झी न्यूज’नं त्याबाबत वृत्त दिलंय. व्यायाम करण्यासाठी कारणं शोधणारे अनेक असतात. पण काही मात्र व्यायामाला सुट्टी मिळू नये यासाठी प्रयत्न करतात. व्यायाम करण्याची एकदा सवय झाली की व्यायाम केल्याशिवाय चैन पडत नाही अशी काहींची अवस्था असते. शिल्पा शेट्टीचीही बहुधा अशीच अवस्था आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शिल्पा व्हिलचेअरवर बसलेली दिसतेय. मात्र ती हॉस्पिटलमध्ये नसून चक्क जिममध्ये दिसतेय. हेही वाचा - वेगवेगळ्या असतात सर्व स्पोर्ट्स इन्ज्युरीज, प्रकारानुसार `हे` उपाय ठरतील फायदेशीर आता तुम्ही म्हणाल इथे ही काय करतेय? पण फिटनेस फ्रीक शिल्पाला डाव्या पायाला झालेल्या दुखापतीमुळेही व्यायामाला सुट्टी देणं आवडत नसावं. कारण त्याही अवस्थेत ती वर्कआऊट करतेय. वेट्सच्या साह्यानं मसल बिल्डिंग करताना ती या व्हिडिओत दिसते आहे. पायाला दुखापत झाली पण हाताला नाही असं म्हणत ती फिटनेसबाबत आग्रही भूमिका घेतेय. पायाला दुखापत झाली तरी वेळेचा सदुपयोग करणं आपल्याला आवडतं असं म्हणून ती स्वतःलाच व्यायामाची प्रेरणा देते. पाय बरा होण्यासाठी अजून थोडा काळ वाट पाहावी लागणार असल्यानं तोपर्यंत शरीराच्या इतर अवयवांना मजबूत करण्यासाठी योग्य दिनचर्येचं पालन करणार असल्याचं तिचं म्हणणं आहे. व्यायामाबाबत उदासीन असणाऱ्यांना तिचा हा 59 सेकंदांचा व्हिडिओ नक्कीच प्रेरणा देईल.

    जाहिरात

    बदलत्या जीवनशैलीत व्यायामाला खूप महत्त्व प्राप्त झालंय. झोपण्याच्या अनिश्चित वेळा, विस्कळीत आहार यांचा शरीरावर होणारा दुष्परिणाम कमी करण्यासाठी नियमित व्यायाम उपयोगी ठरतो. व्यायामाचं हे महत्त्व शिल्पानं वेळीच जाणलं. इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवल्यापासूनच शिल्पानं स्वतःच्या फिगरकडे खूप लक्ष दिलं आहे. लग्न होऊन आई झाल्यावरही तिनं स्वतःचा फिटनेस गमावला नाही. उलट त्यानंतर ती त्याकडे जास्त लक्ष देऊ लागली. योगासनं, पूरक आणि पौष्टिक आहार यांचाही तिच्या फिटनेसमध्ये महत्त्वाचा वाटा आहे. म्हणूनच चाळीशी पार करूनही शिल्पा विशीतल्या तरूणीसारखी दिसते.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात