मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Shikhar Dhawan: शिखर धवन नव्या इनिंगसाठी सज्ज; Double XL मधून गब्बरची बॉलिवूडमध्ये ग्रँड एन्ट्री

Shikhar Dhawan: शिखर धवन नव्या इनिंगसाठी सज्ज; Double XL मधून गब्बरची बॉलिवूडमध्ये ग्रँड एन्ट्री

शिखर धवन-हुमा कुरैशी

शिखर धवन-हुमा कुरैशी

बॉलिवूड 'दबंग गर्ल' सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशी सध्या आपल्या आगामी चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहेत. त्यांच्या 'डबल एक्सएल' चित्रपटाचा टीजर समोर आल्यापासून हा चित्रपट सतत चर्चेत आहे. या चित्रपटातून भारतीय क्रिकेटर शिखर धवन बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India

मुंबई, 11 ऑक्टोबर- बॉलिवूड 'दबंग गर्ल' सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशी सध्या आपल्या आगामी चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहेत. त्यांच्या 'डबल एक्सएल' चित्रपटाचा टीजर समोर आल्यापासून हा चित्रपट सतत चर्चेत आहे. या चित्रपटातून भारतीय क्रिकेटर शिखर धवन बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. सोनाक्षी आणि हुमाचा हा चित्रपट दोन वजनदार महिलांबाबत आहे. या दोन्ही महिला आपली स्वप्ने पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत. सतराम रमाणी दिग्दर्शित, हा चित्रपट जास्त वजन असणाऱ्या त्या सर्व महिलांशी निगडित आहे. आपल्या आजूबाजूला रोजच्या आयुष्यात पाहायला मिळत असलेल्या या घटनांवर भाष्य करणारा सिनेमा आहे.

या बहुचर्चित चित्रपटातून भारतीय क्रिकेटर शिखर धवन बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. परंतु या चित्रपटात शिखर धवन मुख्य अभिनेता म्हणून झळकणार नाहीये. तर तो एका महत्वाच्या भूमिकेत गेस्ट अपिरिअन्स करणार आहे. सध्या शिखरचे चाहते त्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत. हुमासोबतच शिखरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या चित्रपटाची संपूर्ण स्टोरी समोर आलेली नसली तरी या चित्रपटाचा विषय सई ताम्हणकर आणि प्रिया बापट यांच्या वजनदार या मराठी चित्रपटाला मिळता जुळता आहे.

(हे वाचा:Amitabh Bchchan B'day: अमिताभ बच्चन यांना पसंत नाहीत 'या' दोन रंगाचे सूट; मराठमोळ्या डिझायनरने उघड केलं गुपित )

या चित्रपटात वाढत्या वजनामुळे त्रस्त लोकांच्या घटना दाखवण्यात आल्या आहेत. 'डबल एक्सएल' चे दिग्दर्शक सतराम रमाणी यांनी हा दैनंदिन आयुष्यातील मुद्दा फारच वेगळ्या आणि नव्या अंदाजात सादर केला आहे. या चित्रपटात हुमा कुरैशी आणि सोनाक्षी सिन्हासोबत अभिनेता झहीर इकबाल आणि माहत राघवेंद्र दिसणार आहेत. सोबतच या चित्रपटात भारतीय क्रिकेटर शिखर धवन गेस्ट अपीरिअन्स करताना दिसणार आहे. या चित्रपटाचा टीजर समोर आल्या पासून शिखर धवनचे चाहते प्रचंड उत्सुक आहेत.

या चित्रपटाबाबत बोलताना शिखर धवनने सांगितलं की, 'देशासाठी खेळत असताना मी नेहमीच व्यग्र राहतो. याकाळात मनोरंजनासाठी मी चित्रपट पाहतो. जेव्हा या चित्रपटाची ऑफर माझ्याजवळ आली तेव्हा या चित्रपटाची कथा माझ्या मनाला भावली. हा चित्रपट समाजाला एक चांगला आणि महत्वाचा संदेश देणारा आहे. आणि मला विश्वास आहे की, हा चित्रपट पाहिल्यानंतर कोणतीही मुलगी आपलं स्वप्न पूर्ण करण्यापासून माघार घेणार नाही.

हुमा कुरैशी, सोनाक्षी सिन्हा, शिखर धवन, झहीर इकबाल यांचा हा चित्रपट येत्या 4 नोव्हेंबरला चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे. या आगळ्यावेगळ्या चित्रपटासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत. तगडी स्टारकास्ट असणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय कमाल करणार आणि प्रेक्षकांच्या पसंतीस कितपत खरा उतरणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

First published:

Tags: Bollywood, Entertainment, Shikhar dhavan, Sonakshi sinha