बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन आज आपला 80 वा वाढदिवस साजरा करत आहेत.वाढदिवसानिमित्त मध्यरात्री बिग बी त्यांच्या 'जलसा' बंगल्याबाहेर जमलेल्या चाहत्यांना भेटायला आले होते. यावेळी त्यांनी चाहत्यांसोबत केकसुद्धा कापला.
आज सोशल मीडियावर अमिताभ बच्चन यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. चाहते आणि कुटुंबीयांनी बिग बींचा हा वाढदिवस अतिशय खास बनवला आहे.
दरम्यान अनेक चाहत्यांना अमिताभ यांच्याबाबत माहिती नसलेल्या गोष्टी जाणून घेण्याची प्रचंड उत्सुकता आहे. त्यामुळेच आज आपण त्यांच्याबाबत एक रंजक असं गुपित जाणून घेणार आहोत.
अमिताभ बच्चन या वयातसुद्धा आपल्या फिटनेस आणि स्टाईलकडे विशेष लक्ष देतात. त्यांची स्टाईल आजही तरुण कलाकारांना टक्कर देते.
सध्या अमिताभ बच्चन छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो 'कौन बनेगा करोडपती'मध्ये दिसत आहेत. यंदा या शोचा 14 वा सीजन आहे.
या शोमध्ये अमिताभ बच्चन अतिशय स्टायलिश आणि हॅन्ड्सम अंदाजात दिसून येतात. त्यांच्या या रुबाबदार दिसण्याचं श्रेय त्यांची मराठमोळी डिझायनर प्रिया पाटीललादेखील जातं.
आज तकच्या वृत्तानुसार, मुलाखतीदरम्यान प्रियाने सांगितलं की. अमिताभ बच्चन आपल्या स्टाईलबाबत प्रचंड सजग असतात. त्यामुळे त्यांना प्रत्येक लहान-लहान डिटेल्सवर प्रचंड काळजीपूर्वक काम करावं लागतं.
अमिताभ बच्चन यांना ग्रे आणि ब्राऊन कलरचे सूट अजिबात पसंत नाहीत. तर त्यांना ब्लॅक, नेव्ही ब्ल्यू सारखे गडद कलर आवडतात.