मुंबई, 27 फेब्रुवारी : बिग बॉसचा 13 वा सीझन नुकताच संपला मात्र त्याच्या चर्चा अद्याप संपलेल्या नाहीत. बिग बॉस हा एक असा रिअलिटी शो आहे. जो प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतानाच या शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना लोकप्रियता मिळवून देतो. या शो संपल्यावर त्याजागी खतरों के खिलाडी हा रिअलिटी शो सुरू झाला आहे. या शोमध्ये हिंदी टीव्ही इंडस्ट्रीमधील अनेक कलाकार सहभागी झाले आहे. पण त्यासोबतच मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर ही सुद्धा या शोमध्ये दिसत आहे. या शोच्या अगोदर अमृता जिवलगा या मराठी मालिकेत दिसली होती. अमृता खानविलकर अभिनयाव्यतिरिक्त सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. ती तिचे बरेच फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. पण नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिनं बिग बॉस या रिअलिटी शोमध्ये सहभागी व्हायचं होतं मात्र ते शक्य झालं नाही असा खुलासा केला. या सोबतच तिनं या शोमध्ये ती का सहभागी होऊ शकली नाही याचं कारणही स्पष्ट केलं. टायटल साँग कानावर पडताच चिमुकल्यानी काय केलं बघा, Video पाहून अभिमान वाटेल
पतीनं परवानगी न दिल्यांनं अमृता बिग बॉसमध्ये गेली नाही अमृताला बिग बॉसमध्ये सहभागी का झाली नाहीस असा प्रश्न विचारल्यावर अमृता म्हणाली, माझा नवरा हिमांशु खूपच वेगळा माणूस आहे. त्याला घरात भांडण करणं अजिबात आवडत नाही. मग टीव्हीवर आणि तेही बिग बॉसमध्ये कधीच नाही. त्यासाठी तो मला कधीच परवानगी देणार नाही. तो जेव्हा घरात नसतो तेव्हा मी हा शो पाहायचे. पण तो आल्यावर लगेचच चॅनेल बदलत असे. यंदाचा सीझन खूपच धमाकेदार होता.
वासुदेव आला हो…! शंकर महादेवन यांनाही आवरला नाही Video शेअर करण्याचा मोह
खतरों के खिलाडीमधील आपल्या प्रवासाबद्दल बोलताना अमृता म्हणाली, जर एखाद्या कलाकाराला या शोची ऑफर मिळत असेल तर त्यानं ही ऑफर नक्की स्वीकारायला हवी. कारण हा शो तुम्हाला लाइफ टाइम अनुभव देतो. या शोमधील प्रत्येक स्टंट एका शॉकप्रमाणे असतो. शोमध्ये अभिनेत्री करिश्मा तन्ना माझी खूप जवळची मैत्रिण झाली होती आणि आमची मैत्री आताही कायम आहे.
राणा दग्गुबातीनं 30 किलो वजन केलं कमी, आता असा दिसतो ‘बाहुबली’चा भल्लालदेव

)







