मुंबई. 17 ऑक्टोबर : बिग बॉस 13 (Bigg Boss 13) चा विजेता अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे (Sidharth Shukla) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या मृत्यूच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला होता. सिद्धार्थ आपल्याला सोडून गेला आहे यावर आजही विश्वास बसत नाही. तो जरी आपल्यात नसला तरी त्याला शेवटचं पडद्यावर पाहता येणार आहे. सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिलचे (Shehnaaz Gill) ‘अधूरा (Adhura)’ या एक म्युझिक व्हिडिओचे (Adhura First Look Poster) पहिले पोस्टर प्रसिद्ध झालं आहे. सिडनाझचा हा शेवटचा व्हिडीओ 21 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. हे पोस्टर पाहून सिडनाझचे चाहते भावूक झाले आहेत. ते सोशल मीडियावर हे पोस्टर प्रचंड शेअर करत आहेत. या गाण्याला प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालनं (Shreya Ghoshal Upcoming Song) आवाज दिला आहे. श्रेया घोषालनं पोस्टर शेअर करत म्हटलं आहे की, तो एक स्टार होता आणि नेहमीच राहील. लाखो लोकांच्या हृदयात असणारा तो नेहमीच चमकत राहील.
He was a star and will be forever.. The love of millions of hearts will shine bright forever. #Habit our unfinished song.. #Adhura hai par phir bhi poora rahega.. #Sidnaaz ka yeh aakhri gaana, har fan ki khwahish, hamesha ke liye humare dilon mein zinda rahega. pic.twitter.com/CTWkr1wXzR
— Shreya Ghoshal (@shreyaghoshal) October 16, 2021
तसेच श्रेया घोषालनं पुढं म्हटलं आहे की, अपूर्ण पण तरीही पूर्ण. सिडनाझचे हे शेवटचे गाणं आहे. प्रत्येक चाहत्याच स्वप्न.. कायमस्वरूपी आमच्या हृदयात जिवंत राहणार आहे. अधूरा फर्स्ट लुक पोस्टरच्या टॅग लाईन मध्ये म्हटले आहे की, एक अपूर्ण गाणं..एक अपूर्ण कहानी.. एक सिडनाझचं गाणं.. **वाचा-** Bigg Boss फेम या अभिनेत्रीला गंभीर दुखापत, 3 आठवडे बेड रेस्ट घेण्याचा डॉक्टरांचा सल्ला ‘अधूरा (Adhura)’ गाण्याच्या लुक पोस्टरमध्ये सिद्धार्थ आणि शहनाजचे क्यूट बॉन्डिंग दिसत आहे. तो शहनाजचे नाक ओढताना दिसत आहे. या गाण्यात चाहत्यांना सिडनाझची जोडी शेवटच्या वेळी एकत्र पाहायला मिळेल.सोशल मीडियावर हे पोस्टर पाहून चाहतेही भावूक होत आहेत. एका युजरने लिहिले, हे पाहून मी भावनिक झालो आहे. हे गाणं पाहण्यासाठी मी थांबू शकत नाही. तर दुसऱ्याने लिहिले आहे की, सिद्धार्थ नेहमी हृदयात राहील. ‘अधूरा’ गाणं हिट होईल. ‘तर तर काही चाहते गाण्याच्या शीर्षकाबद्दल नाराजी व्यक्त करत आहेत. सिडनाझच्या एका चाहत्याने लिहिले की आम्हाला गाण्याचे शीर्षक #habit हेच नाव हवं आहे. #Sidnaaz हेच दोघांना परिपूर्ण करतं. आमच्या भावनाशी खेळू नका असं या चाहत्याने म्हटले आहे. #sidharthshukla #shehnaazgill हे हॅटटॅग देखील चर्चेत आहेत. **वाचा-** ‘चौथ्या फोटोतला पदर जरा नीट असता तर…’; साडीवरुन कमेंट करणाऱ्या महिलेला हेमांगीची सणसणीत चपराक सिद्धार्थच्या मृत्यूनंतर, या गाण्याच्या शूटिंग दरम्यानचे त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर हे गाणं लवकरात लवकर रिलीज करण्याची मागणी करण्यात आली. आता या गाण्याचे लूक पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. सिद्धार्थ शुक्ला मृत्यूच्या आधी शहनाजसोबत या व्हिडीओमध्ये काम करत होता. या गाण्यचं नाव पहिल्यांदा हॅबिट होत. सिद्धार्थच्या अचानक जाण्यानं सगळं काही बदलून गेलं त्यामुळे गाण्याच्या निर्मात्यांनी गाण्याच नाव बदलण्याचा निर्णय घेतला.