• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • 'चौथ्या फोटोतला पदर जरा नीट असता तर...'; साडीवरुन कमेंट करणाऱ्या महिलेला हेमांगीची सणसणीत चपराक

'चौथ्या फोटोतला पदर जरा नीट असता तर...'; साडीवरुन कमेंट करणाऱ्या महिलेला हेमांगीची सणसणीत चपराक

काही दिवसांपूर्वी ब्रा संदर्भातील एका पोस्टमुळे हेमांगी चर्चेत आली होती. त्यानंतर महिलांच्या पेहरावावरुन कमेंटर करणाऱ्या महिलेला हेमांगीने सुनावलं आहे.

 • Share this:
  मुंबई, 17 ऑक्टोबर : सोशल मीडियावरील आपल्या बोल्ड पोस्टमुळे कायम चर्चेत असलेली अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi Viral Photos on Social media) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दसऱ्यानिमित्ताने हेमांगीने मराठमोळ्या लुकमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यावर विविध प्रकारच्या कमेंट येत होत्या. मात्र त्यातील चाहत्याची एक कमेंट हेमांगीला खूपच खटकली आणि तिने त्यावरून महिलेला चपराक लगावली. काही दिवसांपूर्वी ब्रा संदर्भातील एका पोस्टमुळे हेमांगी चर्चेत आली होती. महिलांनी ब्रा वापरण्यासंदर्भात तिनं एक पोस्ट फेसबुकवर लिहिली होती. यानंतर या विषयावर जोरदार चर्चा सुरु झाली. किती तरी मुलींना ब्रा वापरल्याने अस्वस्थ वाटत राहतं, त्यांची इच्छा नसताना ही 'लोग क्या कहेंगे' या साठी घट्ट ब्रा वापरून स्वतःवर अन्याय करत राहतात, असं हेमांगीनं म्हटल होते. हे ही वाचा-हेमांगी कवीने शिकवली KISS ची बाराखडी! तुम्ही पाहिला का हा VIDEO आता या प्रतिक्रियेमुळे पुन्हा एकदा हेमांगी कवी चर्चेत आली आहे. दसऱ्यानिमित्ताने हेमांगीने काही फोटो शेअर केले होते. त्यात तिने नऊवारी साडीतील काही खास आणि बोल्ड फोटो शेअर केले होते. ते फोटो पाहून एका महिलेने सुरुवातील तिचं कौतुक केलं. मात्र चौथ्या फोटोतील पदर जरा नीट घेतला असता तर अजून छान दिसला असता असं म्हटलं होतं. महिला म्हणाल्या की, खूप सुंदर दिसतेस. साधेपणातलं  तुझं सौंदर्य छानच. तुझे विचार ही खूप छान आहेत. थोडंसं खटकलं- मराठमोळ्या पेहरावावर पदर ही नीट घेतला असतास तर अजुन छान दिसलं असतं. यावर हेमांची पुरती चिडली आणि त्यांची कान उघडणी केली. यावर हेमांगी म्हणाली की, पदर नीट घेतला असता म्हणजे? हे एक बाईच कसं बोलू शकते? याचं नवल वाटतं मला! ते ही तुमच्या सारख्या sleeveless घातलेल्या बाई कडून यावं? मराठमोळ्या संस्कृतीत साडी वर sleeveless blouse कधी होता जरा सांगता का? माझं अज्ञान तेवढंच दूर होईल! इन्स्टाग्रामवरही हेमांगीचे रील्स मोठ्या प्रमाणात पसंत केले जातात. यातच हेमांगीचा आणखी दोन रील चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. या रीलमध्ये हेमांगीच्या अदा पाहायला मिळत आहेत. जांभळ्या रंगाची नऊवारी, पारंपारिक दागिने तसेच नाकात नथ अशा मराठमोळ्या लुकमध्ये हेमांगी दिसत आहे. यातच तिने हिंदी व मराठी गाण्यांवर व्हिडिओ केले आहेत. "इश्काचा बाण" या गाण्यावर हेमांगीने व्हिडीओ केला आहे. यात हेमांगीचा सुंदर लुक पाहायला मिळत आहे.
  Published by:Meenal Gangurde
  First published: