मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Sidharth च्या मृत्यूनंतर shehnaaz ची पहिली Insta Post; पाहून चाहते झाले भावुक

Sidharth च्या मृत्यूनंतर shehnaaz ची पहिली Insta Post; पाहून चाहते झाले भावुक

सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिलची पहिली भेट 'बिग बॉस 13' मध्येच झाली होती. शोदरम्यान दोघांची केमिस्ट्री अशी बनली की शोनंतरही ती कायम राहिली.

सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिलची पहिली भेट 'बिग बॉस 13' मध्येच झाली होती. शोदरम्यान दोघांची केमिस्ट्री अशी बनली की शोनंतरही ती कायम राहिली.

सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिलची पहिली भेट 'बिग बॉस 13' मध्येच झाली होती. शोदरम्यान दोघांची केमिस्ट्री अशी बनली की शोनंतरही ती कायम राहिली.

मुंबई, 28ऑक्टोबर- 'बिग बॉस 13' (Bigg Boss 13) फेम शहनाज गिल(Shehnaaz Gill) आणि सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) यांचा बाँड कोणापासूनही लपलेला नाही. त्यांचे प्रेम, त्यांची मैत्री, त्यांच्या खोड्या, त्यांचं हावभाव, सर्वकाही खूप गोड आणि हृदयस्पर्शी होतं. सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर सिडनाजची जोडी तुटली. पण ती लोकांच्या हृदयात प्रेमाच्या रूपात कायम आहे. सिद्धार्थच्या जाण्याने शहनाज एकटी पडली आहे. एक महिन्याहून अधिक काळ ती शॉकमध्ये होती.सध्या ती आयुष्यात पुढे जात आहे. अलीकडेच 'हौसला राख' आणि 'आदत' सारख्या प्रकल्पांवर काम करून आपलं प्रोफेशनल कमिटमेंट पूर्ण केलं आहे.

दरम्यान, शहनाज गिलने सिद्धार्थ शुक्ला किंवा त्याच्या मृत्यूबद्दल एक शब्दही बोललं नाही. सिद्धार्थबद्दलची भावना तिने आजवर सांगितलीही नव्हती. पण नुकताच तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने आपला आणि सिद्धार्थचा फोटो शेअर करत सिद्धार्थबद्दलची भावना व्यक्त केली आहे. या पोस्टमध्ये एक पोस्टर आहे. पोस्टरमध्ये सिद्धार्थ आणि शहनाज मनमोकळेपणाने हसताना दिसत आहेत.

काय आहे शेहनाजची पोस्ट-

खरं तर, ही पोस्ट शहनाजच्या आगामी म्युझिक व्हिडिओची आहे. या म्युझिक व्हिडिओचे नाव 'तू यही है'आहे. या पोस्टरमध्ये 'सिद्धार्थ शुक्लाला मनापासून श्रद्धांजली' या शीर्षकाखाली लिहिल आहे. हा म्युझिक व्हिडिओ उद्या म्हणजेच 29 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता लाँच होणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे. या पोस्टसह, त्याने लिहिले, “तू माझा आहेस आणि….. सिद्धार्थ शुक्ला” सोबतच तिने हार्ट आणि स्टार इमोजीहि शेअर केल्या आहेत.

(हे वाचा:VIDEO: अभिनेत्री नव्हे तर हा आहे बॉलिवूडचा चॉकलेट बॉय; ओळखलं का स्त्री वेशातील..)

पोस्टरमध्ये 'बिग बॉस'च्या दिवसांपासूनचे शहनाज आणि सिद्धार्थ (सीडनाज म्युझिक व्हिडिओ) यांचे सर्वात आवडते आणि व्हायरल फोटो आहेत, जे कोणाचेही हृदय पिळवटून टाकतील. पोस्टर रिलीज झाल्यानंतर काही मिनिटांतच पोस्टवर हजारोंमध्ये कमेंट्स आल्या आहेत. चाहते त्यांचे प्रेम, समर्थन आणि आनंद व्यक्त करण्यासाठी हार्ट इमोजीवर कमेंट करत आहेत.सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिलची पहिली भेट 'बिग बॉस 13' मध्येच झाली होती. शोदरम्यान दोघांची केमिस्ट्री अशी बनली की शोनंतरही ती कायम राहिली. गेल्या महिन्याच्या २ तारखेला सिद्धार्थ मृत्यू झाला होता. त्याला हृदयविकाराचा झटका आला होता.या घटनेने संपूर्ण देश हादरून गेलं आहे.

First published:

Tags: Entertainment, Sidharth shukla