मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /VIDEO:अभिनेत्री नव्हे तर हा आहे बॉलिवूडचा चॉकलेट बॉय; ओळखलं का स्त्री वेशातील या अभिनेत्याला?

VIDEO:अभिनेत्री नव्हे तर हा आहे बॉलिवूडचा चॉकलेट बॉय; ओळखलं का स्त्री वेशातील या अभिनेत्याला?

नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये एका अभिनेत्याने इतका हुबेहूब स्त्री वेश घेतला आहे की, चाहत्यांना हा व्हिडीओ पाहून फारच आश्चर्य वाटत आहे.

नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये एका अभिनेत्याने इतका हुबेहूब स्त्री वेश घेतला आहे की, चाहत्यांना हा व्हिडीओ पाहून फारच आश्चर्य वाटत आहे.

नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये एका अभिनेत्याने इतका हुबेहूब स्त्री वेश घेतला आहे की, चाहत्यांना हा व्हिडीओ पाहून फारच आश्चर्य वाटत आहे.

मुंबई, 28ऑक्टोबर- बॉलिवूड(Bollywood) कलाकार सतत आपल्या भूमिकेसाठी हवे ते कष्ट घेत असतात. चित्रपटांसाठी ते कधी वजन वाढवतात तर कधी कमी करतात. कधी स्त्री वेश घेतात तर कधी काही वेगळंच. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये एका अभिनेत्याने इतका हुबेहूब स्त्री वेश घेतला आहे की, चाहत्यांना हा व्हिडीओ पाहून फारच आश्चर्य वाटत आहे.

View this post on Instagram

A post shared by Pinkvilla (@pinkvilla)

नुकताच पिंकविलाने आपल्या इन्स्टाग्राम पेजवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये बॉलिवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूर(Ranbir Kapoor) दिसून येत आहे. त्यामध्ये त्याचं मेकअप करण्यात येत आहे. हा व्हिडीओ थोडा खास आहे. कारण यामध्ये रणबीरने चक्क स्त्री वेश घेतला आहे. त्याला लांबलचक केसांचा विगसुद्धा चढवण्यात आला आहे. यामध्ये रणबीर कपूर थेट एखाद्या अभिनेत्रीसारखा दिसत आहे. व्हिडीओ समोर येताच तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.हा व्हिडीओ पाहून चाहते थक्क होत आहेत. त्याला ओळखणंही कठीण झालं आहे. चाहते व्हिडीओवर भरभरून कमेंट्स करत आहेत.अनेकांनी कमेंट्स करत रणबीर कपूर सेम आपली आई नीतू सिंग यांच्यासारखा दिसत असल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी रणबीरला पाहून नीतू सिंग यांच्या तरुणपणाची आठवण होत आहे. तर काहींना तो करिना कपूरसारखा वाटत आहे. अनेकांनी रणबीरच्या डेडिकेशनचं कौतुक केलं आहे.

सध्या अभिनेता रणबीर कपूर आपल्या खाजगी आयुष्याबद्दलही फारच चर्चेत आहे. तिच्या आणि आलिया भट्टच्या लग्नाची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. नुकताच एक रिपोर्ट समोर आला होता त्यानुसार, नीतू कपूर लवकरच आलिया भट्टला नववधूच्या रुपात आपल्या घरात आणणार असल्याचं म्हटलं गेलं होतं. ही बातमी समोर आल्यानंतर चाहते खूप उत्सुक आहेत. गेल्या वर्षीही आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या लग्नाबाबत बातम्या आल्या होत्या, मात्र कोरोनामुळे त्यांना हा निर्णय मागे घ्यावा लागला होता.असं म्हटलं जातं.

(हे वाचा:रणबीर-आलिया डिसेंबरमध्ये बांधणार लग्नगाठ? इटलीमध्ये पार पडणार सोहळा!)

इतकंच नव्हे, तर क्रिकेटर विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माप्रमाणे आलिया-रणबीर इटलीत लग्नगाठ बांधणार असल्याचंही बोललं जात आहे. आलिया-रणबीरच्या लग्नाला फार कमी लोक उपस्थित राहणार असल्याचं समोर येत आहे. त्यात दोन्ही कुटुंबातील काही लोकांची आणि काही खास मित्रांची नावे असणार आहेत.मीडिया रिपोर्टनुसार, 'ब्रह्मास्त्र' नंतर रणबीर कपूर त्याच्या आगामी 'अॅनिमल' चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार होता. परंतु त्यांनी त्याचे वेळापत्रक जानेवारी २०२२ पर्यंत पुढे ढकललं असल्याचं.तर दुसरीकडे आलिया भट्टबद्दल बातम्या आहेत की ती देखील ऑक्टोबरपर्यंत तिच्या सर्व असाइनमेंट पूर्ण करेल. आणि नोव्हेंबर ते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ती स्वत: ला फ्री ठेवणार आहे.

First published:

Tags: Entertainment, Ranbir kapoor