मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Shehnaaz Gill: पापाराझींमुळे शहनाजला बसला चांगलाच फटका; अभिनेत्रीला खर्च करावे लागले इतके रुपये

Shehnaaz Gill: पापाराझींमुळे शहनाजला बसला चांगलाच फटका; अभिनेत्रीला खर्च करावे लागले इतके रुपये

Shehnaaz Gill

Shehnaaz Gill

बिग बॉसमधून बाहेर आल्यापासून शहनाज गिल सतत चर्चेत असते. अशातच शहनाज पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी शहनाज पापाराझींवर भडकल्याचं दिसून आलं.

  मुंबई, 16 ऑगस्ट : 'बिग बॉस 13' मुळे प्रसिद्धी झोतात आलेली शहनाज गिल (Shehnaaz gill) अगदी कमी कालावधीत सगळ्यांची आवडती बनली. तिची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बिग बॉसमधून बाहेर आल्यापासून शहनाज सतत चर्चेत असते. अशातच शहनाज पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी शहनाज पापाराझींवर भडकल्याचं दिसून आलं. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. शहनाज गिलला नुकतंच पापाराझींनी मुंबईतील एका सलूनमधून बाहेर पडताना पाहिले. शहनाजला पाहताच पापाराझींनी तिचे फोटो काढण्यास सुरुवात केली. यावेळी शहनाजनं त्यांच्यांवर आरोप केलेले पहायला मिळालं. शहनाज म्हणाली, तुमच्यामुळे माझे 1000 रुपये खर्च झाले. तुम्ही बाहेर उभे होता त्यामुळे मला 1000 रुपये देऊन स्ट्रेटनिंग करावी लागली. हेही वाचा -  Saif Ali Khan B'day: 800 कोटींचा राजवाडा, महागड्या कार, मुंबईत बंगले; सैफची एकूण संपत्ती पाहून व्हाल थक्क स्वातंत्र्य दिन असल्याने शहनाजनं हातात तिरंगा घेऊन फोटो क्लिक केले. एवढेच नाही तर जय हिंदचा नाराही दिला. यादरम्यान शहनाज नेहमीप्रमाणे तिच्या वेगळ्या अंदाजात दिसली. 'शहनाज खूप सुंदर आहे. जे मनात असते ते तोंडात असते. त्यामुळे आम्हाला ती खूप आवडते', अशा अनेक प्रकारच्या कमेंट चाहते या व्हिडीओवर करत आहेत.
  दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शहनाज सलमान खानच्या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. शहनाज गिल सलमानच्या 'कभी ईद कभी दिवाली' चित्रपटातसुद्धा झळकणार असल्याचं सांगण्यात येत होतं. त्यानंतर शहनाजला चित्रपटातून काढल्याच्या अफवा समोर आल्या. या सगळ्या रंगलेल्या चर्चांवर अखेर शहनाज गिलनं मौन सोडलं. 'LOL गेल्या काही आठवड्यांपासून येणाऱ्या अफवा माझ्या दिवसांच्या मनोरंजाचं साधन झालं आहे. या अफवांमुळे माझी रोजची करमणूक होत आहे. मीही आता वाट पाहू शकत नाही की, लोक चित्रपट पाहतील आणि त्या चित्रपटात मी स्वतःही असेल'.
  Published by:Sayali Zarad
  First published:

  Tags: Big boss, Entertainment, Social media

  पुढील बातम्या