बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान जितका आपल्या व्यवसायिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. त्यापेक्षा जास्त तो त्याच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. आज अभिनेता आपला वाढदिवस साजरा करत आहे.
मन्सूर अली खान पतौडी आणि शर्मिला टागोर यांचा हा मुलगा नेहमीच आपल्या राजेशाही थाटाने लोकांचं लक्ष वेधून घेत असतो. सैफ हा एक गर्भश्रीमंत अभिनेता आहे. त्याला छोटा नवाब असंही जातं.
सैफच्या खाजगी आयुष्यामध्ये लोकांना प्रचंड रस आहे. त्याच्या कुटुंबाबद्दल आणि त्याच्या खानदानी संपत्तीबद्दल लोकांना प्रचंड कुतूहल आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, सैफ अली खान महिन्याला 3 कोटींची कमाई करतो. तर हा अभिनेता वर्षाला तब्बल 30 कोटी रुपये मिळवतो.
सैफ अली खान हा त्याच्या कुटुंबातील दहावा नवाब आहे. त्याच्याकडे अफाट संपत्ती आहे. फक्त त्याच्या खानदानी राजवाड्याची किंमत 800 कोटींपेक्षाही जास्त आहे.
याशिवाय मुंबईमध्ये सैफ अली खानकडे आलिशान बंगले आहेत. त्यांची किंमतसुद्धा कोट्यावधींच्या घरात आहे.
सैफ अली खानला महागड्या गाड्यांची प्रचंड आवड आहे. त्याच्याकडे मोठं कार कलेक्शन आहे. अभिनेत्याजवळ बीएमडब्ल्यू, मस्टान्ग, रेंज रोव्हर, लँड क्रुझर,लेक्सस 470 यांसारख्या अनेक महागड्या कार आहेत.