मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Shehnaaz Gill : शहनाजनं लग्नासाठी ठेवली अनोखी अट; तुमच्यात तर नाही ना 'ती' गोष्ट?

Shehnaaz Gill : शहनाजनं लग्नासाठी ठेवली अनोखी अट; तुमच्यात तर नाही ना 'ती' गोष्ट?

Shehnaaz gill

Shehnaaz gill

शहनाज गिल तिच्या लग्नाच्या अटीमुळे चर्चेत आली आहे. लग्न करण्यासाठी शहनाजनं अट ठेवली असून सध्या याचीच चर्चा सगळीकडे रंगल्याचं दिसत आहे.

  • Published by:  Sayali Zarad
मुंबई, 31 जुलै : 'बिग बॉस 13' मुळे प्रसिद्धी झोतात आलेली शहनाज गिल (Shehnaaz gill) अगदी कमी कालावधीत सगळ्यांची आवडती बनली. तिची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बिग बॉसमधून बाहेर आल्यापासून शहनाज सतत चर्चेत असते. अशातच शहनाज पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी शहनाज तिच्या लग्नाच्या अटीमुळे चर्चेत आली आहे. लग्न करण्यासाठी शहनाजनं अट ठेवली असून सध्या याचीच चर्चा सगळीकडे रंगल्याचं दिसत आहे. शहनाज गिल अलीकडेच 'मसाबा मसाबा सीझन 2' च्या प्रमोशनदरम्यान दिसली. यावेळी मसाबा गुप्ता आणि शहनाज गिल 'मसाबा मसाबा'च्या नवीन सीझनचं प्रमोशन करत होत्या. शिवाय मसाबाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शहनाज गिलसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये शहनाज गिल आणि मसाबा एकमेकांना प्रश्न विचारत आहेत, ज्याचे त्यांना योग्य उत्तर द्यायचे आहे. यावेळी मसाबाने शहनाजला तिच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारले. हेही वाचा -  Shreya Bugde: 'सेलिब्रेटी श्रावण पाळत नाहीत का?', श्रेया बुगडेची पोस्ट पाहून नेटकऱ्यांना पडला प्रश्न मसाबनं शहनाजला विचारलं की, कोणीतरी तुला माझ्याशी लग्न करशील का विचारत आहे. यावर शहनाज म्हणाली, हो बायोडाटा पाठवा. पण मला हे सांगायचंय की माझ्यासोबत राहणं खूप कठिण आहे. याशिवाय माझी एक अटदेखील आहे. 24 तास माझी स्तुती करावी लागते आणि माझ्याबद्द्लच बोलायचं.माझी बडबडही सहन करायची. नाहीतर मी सोडून जाईल. शहनाज आणि मसाबाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शहनाजची लग्नाची अटही चांगलीच चर्चेत आली आहे.
View this post on Instagram

A post shared by Masaba (@masabagupta)

दरम्यान, शहनाज आणि मसाबानं एकमेकींविषयी सगळ्यात जास्त गुगल केलेले प्रश्न विचारले. शहनाजला तिच्या सना नावाविषयीही विचारण्यात आलं. यावेळी सनाने मसाबाला विचारलं की, मसाबा मसाबाची कथा खरी आहे का?. यावर मसाबा म्हणाली की, अर्धी गोष्ट खरी आहे आणि अर्धी नाही. दोघींचा हा व्हिडीओ सध्या अनेकांच्या पसंतीस उतरत आहे आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
First published:

Tags: Big boss, Bollywood, Entertainment, Social media, Talk show

पुढील बातम्या