श्रेया बुगडे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपले फोटो शेअर करत चाहत्यांचं लक्ष वेधत असते. दरम्यान अभिनेत्रीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो श्रेयाच्या व्हेकेशनचे आहेत. अभिनेत्रीला भटकंतीची प्रचंड आवड आहे. सध्या श्रेया बुगडे गोव्यात आपलं व्हेकेशन एन्जॉय करत आहे. श्रेया याठिकाणी निसर्गाचा मनमुराद आनंद घेत आहे. फक्त निसर्गाचाच नव्हे तर श्रेया गोव्यातील खाद्यपदार्थांचादेखील आस्वाद घेत आहे. दरम्यान अभिनेत्रीने बोंबील थाळीची चव चाखल्याचं सांगत फोटो शेअर केला आहे. हे फोटो पाहून नेटकरी तिला 'श्रावण नाही का?', सेलिब्रेटी श्रावण पाळत नाहीत का?' असे प्रश्न विचारत आहेत. कारण सध्या श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे.