मुंबई, 26 फेब्रुवारी: अभिनेता शशांक केतकर नेहमी चर्चेत असतो. त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या महत्वाच्या गोष्टी तो चाहत्यांबरोबर सोशल मीडियावरून शेअर करतो. तो सोशल मीडियावर विविध विषयावर पोस्ट करत त्याचं मत बिनधास्तपणे मांडत असतो. त्याला चाहत्यांचा देखील चांगलाच प्रतिसाद मिळतो. आता नुकतीच शशांकने एक पोस्ट केली आहे जी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. त्याने त्याच्या एका पोस्टद्वारे पुन्हा एकदा महत्वाच्या विषयावर भाष्य करत लक्ष वेधलं आहे. काय म्हणतोय नक्की अभिनेता जाणून घ्या. शशांकने सोशल मीडियावर पुढच्या महिन्याच्या कॅलेंडरचा फोटो पोस्ट केला आहे. त्यात विशेष म्हणजे आता येणाऱ्या सणांविषयी त्याने भाष्य केलं आहे. आता येणाऱ्या काळात होळी, रंगपंचमी आणि धूलिवंदन हे सण मालिकेत साजरे केलेले दाखवतात. पण मालिकेच्या दिग्दर्शकांकडून एक चूक होते ती म्हणजे होळीलाच रंग खेळताना कलाकार दाखवले जातात. हीच चूक शशांकने दाखवून दिली आहे. फोटोमध्ये त्याने कॅलेंडरवरच्या तीनही सणांना हायलाईट केलं आहे. रंग माझा वेगळातील मोठी दीपिका रिअल लाईफमध्ये दिसते अशी; ‘या’ गाजलेल्या मालिकेत केलंय काम शशांकने लिहिलं आहे कि, ‘हे तीन वेगळे सण असतात !!!!! कृपा करुन रंगपंचमी ला होळी म्हणू नका… *आम्ही मराठी परंपरा जपतो असं म्हणणण्या सर्व वाहिन्या, लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार अशा सर्वांसाठी*…. आपण हिंदी च अनुकरण budget मध्ये करतो का??? नाही ना … मग चुकांमध्येतरी कशाला’ असं म्हणत शशांकने हा महत्वाचा मुद्दा सगळ्यांनाच दाखवला आहे.
शशांकच्या या पोस्टवर चाहत्यांनी लिहिलंय कि, ‘बरोबर आहे दादा होळी ला शिमगा किंवा हुताशनी पौर्णिमा, धुलीवंदन ला धुळवड अस म्हणतात’, ‘उत्तर भारतीय होळी ला रंग खेळतात. आपण त्याचं अंधानुकरण करतो म्हणून असं होतं.’, ‘आईशप्पथ… एकदम मुस्काडफोड… धारावाहीक लेखकांनी तर उत आणलाय, आणि त्यांच्या बिनडोक कल्पनांवर आक्षेप घ्यायला गेलं की चॅनेलची डिमांड सांगून मोकळे… वाटायचं की कलाकार तरी कसे असे निर्बुद्धपणे काहीही काम करतात… पण आजची ही पोस्ट आणि विशेषकरून त्यावरील उक्ती वाचून अभिमान वाटला की किमान कोणाचातरी स्वाभिमान शिल्लक आहे. वाह… एकच नंबर…’ अशा कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत.
सध्या शशांक ‘मुरांबा’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेतील अक्षयसुद्धा प्रेक्षकांना तितकाच आवडला. मुरांबा मालिकेतील अक्षय आणि रमाची एक छान आंबट-गोड लव्हस्टोरी प्रेक्षकांना आवडली. पण या मालिकेत काम करत असतानाच शशांकने मालिकेच्या दिग्दर्शक आणि लेखकांना चूक लक्षात आणून दिली आहे. त्याची ही पोस्ट प्रेक्षकांना चांगलीच आवडली असून ते कमेंट करत त्याच्या मताशी सहमती दर्शवत आहे.