मुंबई 2 जुलै**:** प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) ही बॉलिवूडमधील अष्टपैलू अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. जवळपास दोन दशकं आपल्या दर्जेदार अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या प्रियांकानं हॉलिवूड सिनेसृष्टीतही आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. प्रियांका सध्या यशाच्या शिखरावर आहे. (social media post) अन् त्यामुळेच तिचा सोशल मीडियावरील भाव देखील कमालीचा वाढला आहे. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण प्रियांका एका पोस्टसाठी तब्बल तीन कोटी रुपयांपर्यंतच मानधन घेते. हॉपरएचक्यू या वेबसाईटनं सोशल मीडियावरील सर्वात श्रीमंत सेलिब्रिटींची यादी जाहिर केली आहे. या सेलिब्रिटींना इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करण्यासाठी किती रुपयांचं मानधन दिलं जातं याचं संशोधन त्यांनी केलं. आश्चर्याची बाब म्हणजे या यादीत बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा 27 व्या स्थानावर आहे. वेब साईटनं केलेल्या दाव्यानुसार तिला एका पोस्टसाठी कमीतकमी 3 कोटी रुपयांचं मानधन दिलं जातं. या यादीत विल स्मीथ, डेव्हिड बेकम, एमा वॉटसन यांसारखे अनेक नामांकित हॉलिवूड सेलिब्रिटी आहेत. परंतु लक्षवेधी बाब म्हणजे या सर्व सेलिब्रिटींच्या वर एका भारतीय अभिनेत्रीनं स्थान मिळवलं आहे. त्यामुळं चाहते तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. एक वडापाव खाऊन काढायची दिवस’; Article 15 फेम अभिनेत्रीचा संघर्षमय प्रवास
फुटपाथवर झोपणारा तरुण कसा झाला लोकप्रिय गायक; मोहम्मद अजीज यांचा प्रेरणादायी प्रवास या यादीत एकूण 395 सेलिब्रिटींचा सामावेश करण्यात आला आहे. या यादीत पहिल्या तीस सेलिब्रिटींमध्ये केवळ दोन भारतीय आहेत. प्रियांकासोबत भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली याची वर्णी लागली आहे. तो 19 व्या स्थानावर आहे. त्याला एका पोस्टसाठी जवळपास पाच कोटी रुपये दिले जातात.

)







