Home /News /entertainment /

शंकर महादेवन यांच्या समोर तरुणाने गायिलं दादा कोंडकेंचं गाणं! जबरदस्त VIDEO एकदा पाहाच

शंकर महादेवन यांच्या समोर तरुणाने गायिलं दादा कोंडकेंचं गाणं! जबरदस्त VIDEO एकदा पाहाच

बॉलिवूडमधील (Bollywood Singer) प्रसिद्ध गायक शंकर महादेवन (Shankar Mahadevan) यांच्या आवाजाचे कोट्यावधी चाहते आहेत. त्यांचं प्रत्येक गाणं सुपरहिट आहे.

  मुंबई,31 डिसेंबर-   बॉलिवूडमधील  (Bollywood Singer)   प्रसिद्ध गायक शंकर महादेवन   (Shankar Mahadevan)  यांच्या आवाजाचे कोट्यावधी चाहते आहेत. त्यांचं प्रत्येक गाणं सुपरहिट आहे. 'भुलभुलैय्या' चित्रपटातील ब्रिदलेस गाण्यानं त्यांनी सर्वांनाच आश्चर्यचकित केलं होतं. अशा या उत्कृष्ट गायकाने आज आपल्याला आवडलेल्या एका तरुणाचा व्हिडीओ शेअर  (Share Video)  केला आहे. यामध्ये हा तरुण लोकप्रिय मराठी अभिनेते दादा कोंडके यांचं गाणं गाताना दिसून येत आहे. बॉलिवूडमधील कलाकार नेहमीच आपल्या चाहत्यांना प्रतिसाद देताना दिसून येतात. तर काही कलाकार आवडलेल्या चाहत्यांच्या पोस्ट शेअर करून त्यांचं कौतुक करत असतात. असंच काहीसं झालं आहे, शंकर महादेवन यांच्या बाबतीत. बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक शंकर महादेवन  यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. हा व्हिडीओ त्यांच्या एका चाहत्याचा आहे. खरं तर या व्हिडीओमध्ये दिसणारा हा तरुण शंकर महादेवन यांच्या बंगल्याच्या शेजारी राहतो. परंतु आज पहिल्यांदाच त्याला शंकर महादेवन यांना भेटण्याचा योग आला होता. या तरुणाने पहिल्याच भेटीत त्यांचं मन जिंकलं आहे.
  या व्हडिओमध्ये शंकर महादेवन सांगत आहेत, ' माझ्या सोबत असलेल्या या तरुणाचं नाव ओंकार असं आहे. ते कर्जतमध्ये माझ्या घराशेजारी राहतात.टॅलेंट आपल्या इतक्या जवळ असतं, परंतु आपल्याला उशिरा समजत. पुढे बोलताना ते म्हणतात, 'त्यांनी एक सुंदर गाणं गायिलं आहे. हे गाणं आईवर आधारित आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेते दादा कोंडके यांचं हे गाणं असल्याचं ते व्हिडीओमध्ये सांगतात. 'आई तुझ्या मूर्तीवानी, या जगात मूर्ती नाही...' असं हे गाणं आहे. ओंकारसोबत शंकर महादेवनसुद्धा हे गाणं गुणगुणताना दिसून येत आहेत. (हे वाचा:2022 मध्ये जाण्यासाठी प्रियांका चोप्रा Ready! फोटो शेअर करत म्हणाली... ) शंकर महादेवन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते सतत आपल्या गाण्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. चाहत्यांना त्यांचा हा अंदाज फारच आवडतो. त्यांचे इन्स्टाग्रामवर 1 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. शंकर महादेवन यांनी अफाट गाणी गायिली आहेत. तसेच ते अनेक टीव्ही शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत दिसून येतात. त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Entertainment, Video viral

  पुढील बातम्या