मुंबई, 31 डिसेंबर- सध्या हॉलिवूडमध्ये (Hollywood) धमाका करत असलेली बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) नेहमीच चाहत्यांचं लक्ष वेधत असते. आजही सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी प्रियांकाने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. अभिनेत्रीने नवीन वर्षाच्या स्वागतासाठी एक खास पोस्ट केली आहे. अभिनेत्रीचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या परदेशात वास्तव्यास आहे. बॉलिवूडपेक्षा ही अभिनेत्री सध्या हॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. परंतु तिचे चाहते आजही तिच्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून असतात. तिच्याबद्दल जाणून घ्यायला उत्सुक असतात. प्रियांकासुद्धा सतत आपल्या सोशल मीडियाद्वारे आपल्या दैनंदिन अपडेट्स चाहत्यांना देत असते. प्रियांका सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह आहे. ती सतत आपल्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफचे फोटो शेअर करत असते. चाहते तिच्या प्रत्येक पोस्टला भरभरून प्रेम देत असतात. प्रियांकाने फोटो शेअर करताच काही क्षणातच तो फोटो तुफान व्हायरल झालेलं आपल्या सर्वांनाच पाहायला मिळतं. यावरूनच तिच्या लोकप्रियतेचा अंदाज येतो. आणि तिच्या लोकप्रिययतेची पोचपावती म्हणजे आज इन्स्टाग्रामवर अभिनेत्रींचे 72.2 मिलियन फॉलोअर्स आहेत. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी प्रियांकाची खास पोस्ट- सध्या सर्वत्र नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सुरु आहे. सर्वसामान्य लोक असो किंवा सेलिब्रेटी प्रत्येकजण नवीन वर्षात प्रवेश करण्यासाठी उत्सुक आहे. अनेक सेलिब्रेटी परदेशात जाऊन नवीन वर्षाचं स्वागत करत आहेत. अशातच लग्नानंतर परदेशातच वास्तव्यास असलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रानेसुद्धा नवीन वर्षाच्या स्वागताची उत्सुकता व्यक्त केली आहे. प्रियांका चोप्राने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये अभिनेत्री एका झोपाळ्यावर बसलेली दिसून येत आहे. तिच्या चेहऱ्यावर फारच आनंद दिसून येत आहे.. अभिनेत्रीने फोटोला कॅप्शन देत लिहिलं आहे, ‘2022मध्ये झेप घेण्यासाठी तयार आहे’. यावरूनच अभिनेत्रीची उत्सुकता दिसून येते. प्रियांकाने फोटोमध्ये बेबी पिंक कलरचा सॅटिन फ्रॉक परिधान केला आहे. त्यालाच मॅचिंग शूजसुद्धा घातले आहेत. शिवाय डोळ्यावर स्टायलिश सनग्लाससुद्धा आहेत. या लूकमध्ये प्रियांका फारच क्युट दिसत आहे.
प्रियांका चोप्रा सतत कामात व्यस्त असते. परंतु मिळेल त्या वेळी ती आपल्या पतीसोबत आणि कुटुंबासोबत एन्जॉय करताना दिसून येते. नुकताच अभिनेत्रीने पती निक जोनससोबत ख्रिसमस सेलिब्रेशन केलं होतं. निकने आपल्या इंस्टाग्रामवर हा फोटो शेअर केला होता. हा फारच रोमँटिक फोटो होता. यामध्ये प्रियांका निकच्या गुडघ्यावर बसून रोमँटिक पोज देताना दिसून आली होती. (हे वाचा: कतरिना कैफचा दीर या मराठी मुलगीला करतोय DATE? अभिनेत्रीने स्वतः केला खुलासा ) प्रियांकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, अभिनेत्री नुकताच हॉलिवूडच्या प्रसिद्ध ‘द मॅट्रिक्स’ या चित्रपटाच्या चौथ्या भागात झळकली आहे. या चित्रपटात तिने ‘सती’ ही व्यक्तरेखा साकारली आहे. प्रियांकाच्या या लूकची आणि भूमिकेची प्रचंड चर्चा झाली होती. प्रियांकाच्या अनेक बॉलिवूड फ्रेंड्सनी सोशल मीडियावर तिचं कौतुकदेखील केलं होतं. तसेच प्रियांका चोप्रा लवकरच बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार आहे. झोया अख्तरच्या एका रोड ट्रिप मुव्हीमध्ये ती दिसणार आहे. यामध्ये प्रियांकासोबत कतरिना कैफ आणि आलिया भट्ट असणार आहेत.

)







