मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

शिल्पा शेट्टीच्या बहिणीचं ब्रेकअप; Raqesh Bapat शी नातं तोडल्याची Shamita Shetty ची अधिकृत घोषणा

शिल्पा शेट्टीच्या बहिणीचं ब्रेकअप; Raqesh Bapat शी नातं तोडल्याची Shamita Shetty ची अधिकृत घोषणा

शमिता आणि राकेश यांच्या असंख्य चाहत्यांना ज्या बातमीने अतीव दुःख होईल अशी घटना समोर आली आहे. याबद्दल दोघांनीही सोशल मीडियावरून माहिती दिली आहे.

शमिता आणि राकेश यांच्या असंख्य चाहत्यांना ज्या बातमीने अतीव दुःख होईल अशी घटना समोर आली आहे. याबद्दल दोघांनीही सोशल मीडियावरून माहिती दिली आहे.

शमिता आणि राकेश यांच्या असंख्य चाहत्यांना ज्या बातमीने अतीव दुःख होईल अशी घटना समोर आली आहे. याबद्दल दोघांनीही सोशल मीडियावरून माहिती दिली आहे.

  • Published by:  Rasika Nanal
मुंबई 26 जुलै: टीव्ही जगतातील एक प्रसिद्ध कपल म्हणून नावारूपास आलेले शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांच्या नात्याबद्दल एक मोठी माहिती सध्या समोर येत आहे. शमिता आणि राकेश यांचं ब्रेकअप झालं असून याबद्दल अधिकृत घोषणा काहीच वेळापूर्वी अभिनेत्रीने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये केली आहे. बिग बॉस ओटीटी या टीव्ही रिऍलिटी शोमध्ये हे दोघे जवळ आले होते आणि त्यांच्या नात्याची सुरुवात झाली होती. सध्या शमिता आणि राकेश (shamita shetty and raqesh bapat break up) यांचे बरेच फोटो viral होताना दिसत आहेत. पण हे फोटो त्यांच्या एका म्युजिक व्हिडिओचे असून याची माहिती शमिताने दिली आहे. तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये ती असं म्हणते, “मला असं वाटतं हे स्पष्ट करणं फार गरजेचं आहे. मी आणि राकेश आता एकत्र नाही आहोत आणि बरेच दिवसांपासून नव्हतो. पण हा सुंदर म्युजिक व्हिडिओ आमच्या चाहत्यांसाठी आहे ज्यांनी आमच्यावर भरभरून प्रेम केलं आणि आशीर्वाद दिले. एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून आमच्यावर असलेलं प्रेम असंच ठेवा. इथून पुढे येणाऱ्या नव्या क्षितिजांची आणि साकारात्मकतेची अपेक्षा ठेऊया. सगळ्यांना भरपूर प्रेम आणि कृतज्ञता.” राकेशने सुद्धा याबदल इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत आपलं मत मांडलं आहे. “मी या माध्यमातून स्पष्ट करू इच्छितो की मी आणि शमिता आता एकत्र नाही आहोत. नियतीने चुकीच्या वेळी आम्हाला एकत्र आणायचं ठरवलं. आमच्यावर भरभरून प्रेम केलेल्या ‘शरा’ फॅमिली आणि फॅन्सचे खूप आभार. मी एक प्रायव्हेट व्यक्ती असल्याने मला या ब्रेकअपबद्दल फारशी वाचत्या करायची नव्हती. पण आमच्या चाहत्यांचा विचार करून मी ही घोषणा करायचं ठरवलं. मला कल्पना आहे की याने तुम्हाला दुःख होईल आणि वाईट वाटेल पण अशा करतो की आम्हा दोघांवर तुम्ही असंच प्रेम कायम करत राहाल. हा म्युजिक व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी आहे.” हे ही वाचा- Surrogacy in Bollywood: आमिर, शाहरुखच नव्हे, अनेक सेलेब्रिटींनी निवडला सरोगसीचा पर्याय; एकीला तर झालेत तिळे शमिता आणि राकेश यांच्या एकत्र नसण्यावर बरीच चर्चा होत होती पण त्यावर ठोस स्पष्टीकरण मिळताना दिसत नव्हतं.
मात्र शमिता आणि राकेशने दिलेल्या या स्पष्टीकरणाने अनेक गोष्टीचा खुलासा झाला असून राकेश आणि शमिता ही जोडी आवडणाऱ्या चाहत्यांमध्ये दुःखाचं वातावरण बघायला मिळत आहे. त्यांचा एक मोठा चाहतावर्ग सध्या दुखावला गेला असून अनेकांना बातमीवर विश्वास ठेवणं कठीण जात आहे.
First published:

Tags: Break up, Tv actor, Tv actress

पुढील बातम्या