जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'सासू-सुनांच्या मालिकांनी टीव्हीचा सत्यानाश...'; एकता कपूरवर भडकले मुकेश खन्ना

'सासू-सुनांच्या मालिकांनी टीव्हीचा सत्यानाश...'; एकता कपूरवर भडकले मुकेश खन्ना

एकता कपूर आणि मुकेश खन्ना

एकता कपूर आणि मुकेश खन्ना

ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना यांनी निर्माती एकता कपूरवर निशाणा साधत सध्याच्या मालिकांबाबत खंत व्यक्त केली आहे. ‘शक्तिमान’ या मालिकेतून मुकेश खन्ना प्रत्येकाच्या परिचयाचे झाले आहेत.

  • -MIN READ Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 25 सप्टेंबर-   ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना यांनी निर्माती एकता कपूरवर निशाणा साधत सध्याच्या मालिकांबाबत खंत व्यक्त केली आहे. ‘शक्तिमान’ या मालिकेतून मुकेश खन्ना प्रत्येकाच्या परिचयाचे झाले आहेत. बालपणी सर्वांच्या आवडीचा सुपरमॅन म्हणजे शक्तिमान होय. या मालिकेतून त्यांना प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळी छाप पाडली आहे. परंतु सध्याच्या मालिकांबाबत ते काहीसे नाराज दिसत आहेत. याच संदर्भात त्यांनी एकता कपूरवर निशाणा साधला आहे. ‘शक्तिमान’ फेम अभिनेते मुकेश खन्ना आपल्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखले जातात. ते नेहमीच सोशल मीडियावर आपलं मत व्यक्त करत असतात. बऱ्याचवेळा ते कलाकारांवर निशाणा साधताना दिसून येतात. आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे मुकेश खन्ना अनेकवेळा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. मात्र तरीसुद्धा ते आपलं मत व्यक्त करताना दिसून येतात. आज ते पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी निर्माती-दिग्दर्शक एकता कपूरवर निशाणा साधला आहे. पाहूया नेमकं काय घडलंय. नुकतंच अभिनेते मुकेश खन्ना यांनी टीव्ही मालिकांबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. याबाबत बोलताना त्यांनी म्हटलं, ‘सॅटेलाईट टीव्हीचा सॅन्च्यूरेशन पॉईंट आलेला आहे. सर्व लोक एकमेकांना कॉपी करत आहेत. प्रत्येक चॅनेलवर तेच-तेच साडी, लेहेंगे, झुमके,दागिने घालून सासू-सुना वावरत आहेत. सध्या टीव्हीवर त्यांचच राज्य आहे. प्रत्येक मालिकेत हे कलाकार जास्तीत-जास्त खलनायिकेचे एक्स्प्रेशन घेऊन फिरत असतात’.

News18लोकमत
News18लोकमत

मुकेश खन्ना यांनी अप्रत्यक्षणपणे एकता कपूरवर निशाणा साधत म्हटलंय, ‘मी काही वर्षांपूर्वी म्हटलं होतं ‘सास भी कभी बहू थी’ या मालिकेने टीव्हीचा सत्यानाश केला आहे. हेच एका अभिनेत्याने पुन्हा मला म्हटलं की, सासू-सुनांच्या मालिकेमध्ये आपला टीव्ही कुठेतरी हरवला आहे. हे दुःखद आहे परंतु सत्य आहे. असं म्हणत अभिनेत्याने टीव्ही मालिकांवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

**(हे वाचा:** Khatron Ke Khiladi 12 Winner: हा सेलिब्रेटी ठरला शोचा विजेता?ग्रँड फिनाले आधीच फोटो लीक ) मुकेश खन्ना यांनी म्हटलं, आता काहीतरी नवीन विचार करण्याची गरज आहे. मुकेश खन्ना यांनी सांगितलं की, त्यांनी नुकतंच अभिनेता पंकज बेरी यांचं वक्तव्य वाचलं त्यांनी सासू-सुनांच्या मालिकांमध्ये टीव्हीचं जग हरवल्याचं म्हटलं आहे. याबाबत बोलताना मुकेश खन्नानी म्हटलं, ‘मला हे वाचून आनंद झाला. कारण हेच मी तब्बल 6…7 वर्षांपूर्वी म्हटलं होतं’. तसेच मुकेश खन्नानी आपल्या युट्युब वलॉगमध्ये एकता कपूरवर नाराजी व्यक्त करत म्हटलं आहे, ‘एकता कपूरने सासू-सुना बनवून टीव्हीचा सत्यानाश केला आहे. त्यांचं मत आहे की, ‘सास भी कभी बहु थी’ या मालिकेमुळे टीव्हीचा सुवर्णकाळ संपुष्ठात आला आहे. त्यांनी पुढे म्हटलं की, ज्याठिकाणी रामायण, महाभारत,चंद्रकांता आणि गुप्तहेरवर आधारित अनेक शो तयार झाले या सॅटेलाईट टीव्हीने सर्व नष्ट केलं’. त्यांचं असं स्पष्ट मत आहे की, एकता कपूरच्या मालिकांमुळे टीव्हीवर येणाऱ्या दर्जेदार मालिकांचा टीआरपी कमी झाला आहे’. आता या सर्वाला एकता कपूर नेमकं काय उत्तर देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात