• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • शाहरुख खानने कानशिलात लगावलेल्या प्रकरणात हनी सिंगला पत्नीने दिली होती साथ; अशी सावरली होती परिस्थिती

शाहरुख खानने कानशिलात लगावलेल्या प्रकरणात हनी सिंगला पत्नीने दिली होती साथ; अशी सावरली होती परिस्थिती

हनी सिंगची पत्नी शालिनी तलवारने (Shalini Talwar) हनी सिंग विरोधात घरगुती हिंसेचा (Domestic violence) गुन्हा नुकताच दाखल केला आहे.

 • Share this:
  मुंबई 4 ऑगस्ट : प्रसिद्ध रॅपर, गायक हनी सिंग (Honey Singh) सध्या फारच चर्चेत आहे. पण यावेळी प्रकरण त्याच्या गाण्याचं नाही तर त्याच्या पत्नीचं आहे. हनी सिंगची पत्नी शालिनी तलवारने (Shalini Talwar) हनी सिंग विरोधात घरगुती हिंसेचा (Domestic violence) गुन्हा नुकताच दाखल केला आहे. पण काही वर्षांपूर्वी शालिनी आपल्या पतीच्या बचावासाठी उतरली होती. जेव्हा हनी सिंगची शाहरुख खानसोबत कॉन्ट्रोव्हर्सी झाली होती. दरम्यान काही वर्षांपूर्वी अशी बातमी आली होती की एका सेटवर शाहरुख खानने (Shahrukh Khan) हनी सिंगला कानशिलात लगावली. ही गोष्ट 2014 सालची आहे. वृत्तांनुसार त्यावेळी एका टुर दरम्यान नशेत हनी सिंगने गैरवर्तवणूक केली होती, त्यावेळी शाहरुख खानने त्याला कानशिळात लगावली होती. त्यावेळी ही बातमी फार चर्चेत होती. यावर शालिनीने सांगितलं होतं की, “या सगळ्या रचलेल्या गोष्टी आहेत, यात काहीच तथ्य नाही. तिने म्हटलं होतं की, हनी शाहरुखचा फार आदर करतो, तर शाहरुखही त्याला भावप्रमाणे प्रेम करतो.”

  Mercedes, Jaguar आणि BMW नंतर करण जोहरने घेतली आणखी एक महागडी गाडी; किमंत ऐकून तुम्हीही चक्रावून जाल

  इतकच नाही तर शालिनीने मीडियाशी बोलताना सांगितलं होतं, “एकदा एका टुरवर हनी बीपीचं हेवी मेडिसीन घेतल्यामुळे चक्कर येऊन पडला होता. त्यावेळी शोची प्रॅक्टीस सुरू होती. पण पडल्यामुळे हनीच्या डोक्याला आणि कंबरेला मोठा मार लागला होता, त्यामुळे त्याला टुरमधून परताव लागलं होतं.”

  सेम टू सेम! भूमी पेडणेकरची बहीण पाहिलीत का? अगदी हुबेहूब आहे कॉपी

  त्यानंतर 2020 मध्ये टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत हनी सिंहने देखील म्हटलं होतं की, “शाहरुख खानसोबत माझं फार चांगल बॉन्डिंग आहे. ‘लुंगी डान्स’च्या यशानंतर शाहरुखने स्वतः मला घरी दिवाळी पार्टीसाठी बोलावलं होतं.” दरम्यान शालिनी तलवार , हनी सिंगच्या पत्नीने त्याच्यावर घरगुती हिंसेसोबतच, मानसिक आणि शारिरीक हिंसेचेही आरोप केले आहेत. तसेच आर्थिक अफरातफर केल्याचंही म्हटलं आहे. याशिवाय याची सुरुवात त्यांच्या हनिमूनपासूनच झाली होती असंही तिने म्हटलं आहे. 10 वर्षांपूर्वी शालिनी आणि हनी सिंगचा विवाह झाला होता.
  Published by:News Digital
  First published: