• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • रणबीर कपूर OTT वर करणार धमाकेदार एन्ट्री! अशी असणार स्क्रिप्ट

रणबीर कपूर OTT वर करणार धमाकेदार एन्ट्री! अशी असणार स्क्रिप्ट

बॉलिवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूरकडे सध्या अनेक प्रोजेक्ट्स आहेत. इतकंच नव्हे तर रणबीर OTT वर एन्ट्री करण्यासाठीसुद्धा तयार झाला आहे.

 • Share this:
  मुंबई, 15 सप्टेंबर- बॉलिवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूरकडे सध्या अनेक प्रोजेक्ट्स आहेत. इतकंच नव्हे तर रणबीर OTT वर एन्ट्री करण्यासाठीसुद्धा तयार झाला आहे. 'एंथोलॉजि' साठी तो इरोज नाऊसोबत करार करू शकतो. ही सीरिज लव्ह अफेअरवर आधारित असणार आहे. यामध्ये प्रेमाच्या वेगवेगळ्या छटा दाखविण्यात येणार आहेत. समोर आलेल्या रिपोर्टनुसार या सीरिजला 'ऐसा वैसा प्यार' असं नाव देण्यात आलं आहे. यामध्ये चार वेगवेगळ्या प्रेमकथा दाखविण्यात येणार आहेत. (हे वाचा:Beach Diaries! सारा अली खान बीचवर घालवतेय निवांत वेळ; Bikini Photos होतायत Viral) पिंकविलाने याबद्द्दलच वृत्त दिलं आहे, रणबीर कपूरने नेहमीच आपल्या चित्रपटातून प्रत्येक वयाच्या व्यक्तीला प्रभावित केलं आहे. रणबीरच्या गुड लुक्स, चार्मिंग अभिनयने जगभरातील मुलींना वेड लावलं आहे.  त्यामुळेच निर्माते एका प्रेम कथेवर आधारित सीरिजसाठी रणबीरचा विचार करत असतील तर यात वावगं काहीच नाही. हि सीरिज पूर्णत्वास आली, तर रणबीरला सर्वांचं तितकंच प्रेम मिळेल यात शंका नाही. (हे वाचा:Manike Mage Hithe: 'कोलावेरी'पेक्षाही जबरदस्त हिट! एव्हाना ऐकलंच असेल हे गाणं) मात्र आपल्याला सांगू इच्छितो, याबद्दल अजून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. जर हा प्रोजेक्ट बनला. तर रणबीर कपूरच्या चाहत्यांसाठी ही एक मोठी मेजवानी असणार आहे. काही महिन्यांपूर्वी नेटफ्लिकने आपल्या अधिकृत मीडिया अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यामध्ये रणबीर सी यू सुन' असं म्हणत असल्याचं दिसून आलं होतं. त्यामुळे चाहत्यांच्या मनात धडधड आहे.
  Published by:Aiman Desai
  First published: