वयाच्या 45 व्या वर्षीही माजी मिस वर्ल्ड ऐश्वर्या रायचं सौंदर्य तसूभरही कमी झालेलं नाही आणि याचा प्रत्यय नुकत्याच पार पडलेल्या Paris Fashion Week मध्ये आला.
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चननं लॉरियल पॅरिसच्या फॅशन वीकमध्ये मध्ये हजेरी लावली आणि साऱ्यांच्याच नजरा तिच्यावर खिळल्या.
बऱ्याच काळानंतर ऐश अशाप्रकारे बिनधास्त अवतारात दिसली. मात्र वयाच्या 45 व्या वर्षीही ऐश्वर्याच्या सुपर कुलनं तिच्या चाहत्यांसह सर्वांनाच चकीत केलं.
या इव्हेंटसाठी ऐश्वर्यानं पर्पल कलरचा लॉन्ग स्लिट आणि फ्लोरल प्रिंट असलेला गाऊन परिधान केला होता. यात तिचं सौंदर्य आणखीच खुलून दिसत होतं.
ऐश्वर्या कान्स तसेच अशाप्रकारच्या मोठ्या इव्हेंटमध्ये हजेरी लावत असते अणि तिच्या चाहत्यांसाठी या इव्हेंटचे फोटो म्हणजे एखाद्या मेजवानी पेक्षा कमी नसतात.
ऐश्वर्याचा हा लुक तिच्या चाहत्यांच्या पसंतीत येत असून पॅरिस फॅशन वीकचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.
या इव्हेंटमध्येही ऐश्वर्या तिची सिग्नेचर स्टाइल करताना दिसली. ती इतर इव्हेंट प्रमाणे याही इव्हेंटमध्ये सर्वांना फ्लाइंग किस देताना दिसली.
या फॅशन शोसाठी ऐश्वर्यानं केसांचा बन बांधला होता. रेड कलरची लिपस्टिक आणि ग्लिटरी आय मेकअपमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.