जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / HBD: इतक्या पैशांमध्ये न्यूड सीन देशील का?करण जोहरच्या या प्रश्नावर शाहरुख खानने दिलं होतं असं उत्तर

HBD: इतक्या पैशांमध्ये न्यूड सीन देशील का?करण जोहरच्या या प्रश्नावर शाहरुख खानने दिलं होतं असं उत्तर

HBD: इतक्या पैशांमध्ये न्यूड सीन देशील का?करण जोहरच्या या प्रश्नावर शाहरुख खानने दिलं होतं असं उत्तर

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan Birthday) आज त्याचा 56 (56th Birthday) वा वाढदिवस साजरा करत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 2 नोव्हेंबर - बॉलिवूड  (Bollywood)  अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan Birthday) आज त्याचा 56 (56th Birthday) वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने जगभरातील त्याचे चाहते त्याला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा देत आहेत. शाहरुख खान बॉलिवूडचा बादशाह म्हणून ओळखला जातो. 1992 पासून शाहरुख खान बॉलीवूडमध्ये सतत सक्रिय आहे.  आणि एकापाठोपाठ एक हिट चित्रपट देऊन तो प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. शाहरुख खान केवळ एक चांगला अभिनेता नाही तर एक अद्भुत व्यक्तीदेखील आहे. इतकं यशस्वी असूनही तो चाहत्यांशी किंवा मीडियाशी अगदी फ्रेंडली दिसतो.

जाहिरात

शाहरुख खानचं आणखी एक मोठं  वैशिष्ट्य म्हणजे त्याची विनोदबुद्धी अर्थातच सेन्स ऑफ ह्युमर. शाहरुख खानने अनेक प्रसंगी आपल्या बुद्धिमत्तेने दाखवून दिलं आहे की त्याच्यासारखी विनोदबुद्धी बॉलिवूडमधील इतर कोणत्याही स्टारमध्ये नाही. तो अनेक वेळा विनोदाने समोरच्याची बोलती बंद करतो. आज हा अभिनेता ५६ वर्षांचा झाला आहे.  मात्र आजही त्याला एक मुख्य अभिनेता म्हणूनच पाहिलं जात. चाहते आतुरतेने त्याच्या चित्रपटांची वाट पाहत असतात. शाहरुख खानचा जन्म २ नोव्हेंबर १९६५ मध्ये नवी दिल्ली येथे झाला होता. एकासर्वसामान्य कुटुंबात जन्मलेला हा मुलगा आज बॉलिवूडवर राज्य करतो. दिग्दर्शक करण जोहर आणि शाहरुख खान फार घट्ट मित्र आहेत. यांची मैत्री जगजाहीर आहे. दरम्यान शाहरुख खान आपला मित्र करण जोहरच्या प्रसिद्ध कॉफी विथ करण या शोमध्ये पोहोचला होता. यावेळी करणने त्याला अतरंगी प्रश्न विचारला होता. यावर शाहरुखने आपल्या नेहमीच्या हटके अंदाजात मजेशीर उत्तर दिलं होतं. करणने त्याला न्यूड सीनबदल विचारलं होतं. करणनं म्हटलं होतं, ‘जर तुला कोणी बिलियन डॉलर्स दिले तर तू न्यूड सीन देशील का?’ यावर शाहरुख खानने हसत हसत उत्तर दिलं होतं ‘यापेक्षा कमी पैशांमध्येपण मी द्यायला तयार होईन’. असं म्हणत त्याने करण जोहरची बोलती बंद केली होती. (हे वाचा: फॅन्सनी गुपचूप दुबईत बनवलेला दीपिका पादुकोणचा ‘तो’ VIDEO व्हायरल ) असंच काहीसं आयपीएल दरम्यान देखील झालं होतं, IPL दरम्यान मंदिरा बेदीने शाहरुख खानला विचारले, ‘शिल्पा शेट्टी (राजस्थान रॉयल्स) आणि प्रीती झिंटा (किंग्स इलेव्हन पंजाब) तुमच्यासोबतचे नाते बिघडवणार नाही का? यावर शाहरुखनं उत्तर दिलं होतं , ‘मला नाही वाटत मंदिरा, बघ मी तिचं करिअर सुरू केलंय आणि मला जितकं आठवतं तितकं तुझंदेखील मीच करिअर सुरू केलं आहे.’

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात