नुकतच दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालं आहे. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नि सायरा बानू या आहेत. त्यांना या कठीण परिस्थितीत धीर देण्यासाठी अनेक दिग्गज कलाकार गेले आहेत. त्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे देखील गेले होते.
अभिनेता शाहरुखला सायरा आणि दिलीप कुमार मुलाप्रमाणे मानायचे. एका मुलखातीत सायरा यांनी म्हटलं होतं की जर आम्हाला मुलगा असता तर तो शाहरुख सारखा असता.