मुंबई, 2 नोव्हेंबर- बॉलिवूड (Bollywood) अभिनेता ईशान खट्टरने (Ishan Khattar) एक दिवस आधी आपला वाढदिवस साजरा केला आहे. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणाऱ्यांचेही त्यानं आभार मानले. त्यानं त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर कृतज्ञता पोस्ट लिहिली आणि लोकांना विनंती म्हणून त्याचा 'रुह का दाना पानी' चित्रपट पाहण्याचं आवाहनदेखील केलं आहे. ईशानच्या वाढदिवशी त्याची वहिनी म्हणजेच शाहिद कपूरची (Shahid Kapoor Wife) पत्नी मीरा राजपूत (Mira Rajput) हिनेही त्याला एका क्यूट पोस्टद्वारे शुभेच्छा दिल्या होत्या. मीरा आणि ईशानची बाँडिंग खूप खास आहे. हे दोघे दीर-वहिनी इतरांना 'भाभी देवर' गोल देतात.
View this post on Instagram
अशी होती मीरा राजपूतची पोस्ट-
मीरा राजपूतने दीर ईशान खट्टरचा एक स्टायलिश फोटो शेअर करूनशुभेच्छा दिल्या आहेत. तिच्या या पोस्टमध्ये प्रेम आणि विनोद दोन्ही दिसून येत आहे. मीरा राजपूतने लिहिले, "उत्साही, प्रतिभावान, सर्वात मोठे केस आणि सर्वात मोठे हृदय, नेहमीच खूप प्रेमळ, नेहमीच तिसरे चाक आणि संपूर्ण जगातील सर्वोत्तम काका. इशान खट्टर, वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुला खूप सारं प्रेम' असं म्हणत मीराने ईशान खट्टरला शुभेच्छा दिल्या आहेत. ईशान आणि मीरा राजपूत नेहमीच आपल्या खास नात्यामुळे ओळखले जातात. या दोघांमध्ये खूप खास नातं आहे. मीरा ईशानला आपला लहान भाऊ मानते. सोशल मीडियावर सतत यांची माजमस्ती पाहायाला मिळत असते.
मीरा राजपूतनं पोस्टमध्ये पुढं लिहिलं की, "आपण नेहमी एकमेकांचे सर्वोत्कृष्ट फोटो क्लिक करूया आणि 90 च्या दशकातील मुले बनू या. (जेव्हा जेव्हा संभाषण तुमच्या बाजूने थांबते, तेव्हा या साइडबारप्रमाणे चालू ठेवा… पुढे जा.) नेहमी आनंदी राहा आणि मुलांना व्यस्त ठेव.” मीराच्या या पोस्टवर ईशानने प्रतिक्रिया देत म्हटलं आहे. "हाहा.. आमिन. तुझे शब्द केकपेक्षा गोड आहेत. मुली, सारं प्रेम'. यावरून या दोघांच्या निखळ नातं दिसून येतं. या दीर-वहिनीच्या जोडीची सोशल मीडियावर बरीच चर्चा असते.
(हे वाचा:HBD: इतक्या पैशांमध्ये न्यूड सीन देशील का?करणच्या प्रश्नावर असं होतं शाहरुखचं)
ईशान खट्टरचं त्याचा भाऊ शाहिद कपूर आणि वहिनी मीरा राजपूत यांच्यासोबत खास बॉन्ड आहे. हे तिघे अनेकदा सोशल मीडियावर गप्पा मारताना आणि विनोद करताना दिसतात. काही दिवसांपूर्वी जेव्हा शाहिद कपूरने मीरा राजपूतसोबतचा सकाळचा सेल्फी इन्स्टाग्रामवर शेअर केला होता, तेव्हा इशान खट्टरने सर्वात आधी 'क्युटीज' अशी कमेंट दिली होती. ईशान खट्टरचा जन्म 1 नोव्हेंबर 1995 रोजी मुंबईत झाला होता. ईशान हा बॉलिवूड अभिनेत्री नीलिमा आझमी आणि राजेश खट्टर यांचा मुलगा आणि शाहिद कपूरचा सावत्र भाऊ आहे. ईशान त्याचा सावत्र भाऊ शाहिद कपूरच्या खूप जवळ आहे. आणि त्याच्यासोबत सतत वेळ घालवत असतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Shahid kapoor