जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Shahid Kapoor Wife: 'हा' अभिनेता आहे शाहिद कपूरच्या पत्नीचा एक्स-बॉयफ्रेंड; गर्लफ्रेंडसोबत गुपचूप उरकलं लग्न

Shahid Kapoor Wife: 'हा' अभिनेता आहे शाहिद कपूरच्या पत्नीचा एक्स-बॉयफ्रेंड; गर्लफ्रेंडसोबत गुपचूप उरकलं लग्न

'हा' अभिनेता आहे शाहिद कपूरच्या पत्नीचा एक्स-बॉयफ्रेंड

'हा' अभिनेता आहे शाहिद कपूरच्या पत्नीचा एक्स-बॉयफ्रेंड

Shahid Kapoor Wife’s Ex Boyfriend: शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. मीराने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेलं नाहीय. पण तरीसुद्धा इंडस्ट्रीमध्ये तिच्या नावाची जोरदार चर्चा आहे.

  • -MIN READ Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 26 एप्रिल- शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. मीराने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेलं नाहीय. पण तरीसुद्धा इंडस्ट्रीमध्ये तिच्या नावाची जोरदार चर्चा आहे. आज मीरा आपल्या आगामी टीव्ही जाहिरातींमुळे किंवा कोणत्याही लूकमुळे नव्हे तर आपल्या भूतकाळामुळे चर्चेत आली आहे. शाहिद कपूरच्या भूतकाळाबद्दल जवळपास सर्वांनाच माहिती आहे. पण त्याच्या पत्नीच्या भूतकाळाबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. मीराचा एक्स बॉयफ्रेंड आदित्य लाल असल्याचं अनेक रिपोर्ट्समध्ये सांगितलं जातं.आदित्यने नुकतंच लग्नगाठ बांधत संसार थाटला आहे. ‘गुमराह’ चित्रपटातून प्रसिद्धीत आलेल्या आदित्य लालने गेल्या महिन्यातच आपली गर्लफ्रेंड नव्या चनानासोबत लग्नगाठ बांधली आहे. नव्या व्यवसायाने एक स्टायलिस्ट आहे. हे दोघे गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते.

News18लोकमत
News18लोकमत

त्यांनंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला होता. नुकतंच अभिनेत्याने आपल्या जुन्या नात्याबद्दल मौन सोडलं आहे. ज्यामुळे शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. (हे वाचा: शाहरुख खानसोबत होणार होता किसिंग सीन, अभिनेत्रीने ऐनवेळी दिला नकार, पुढे जे घडलं… ) आदित्य लाल आणि नव्याने आपला विवाहसोहळा फारच खाजगी ठेवला होता. आपल्या लग्नाची त्यांनी कोणालाही भनक लागू दिलेली नव्हती. आपल्या कुटुंबाच्या उपस्थित त्यांनी गुपचूप लग्नगाठ बांधली होती. या लग्नात इंडस्ट्रीशी संबंधित कोणीही नव्हते. 18 एप्रिलला आदित्य आणि नव्याच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला आहे. नुकतंच हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना आदित्यने त्याच्या लग्नाबद्दल आणि भूतकाळाबद्दल मोकळेपणाने संवाद साधला आहे. आदित्य म्हणाला, ‘आयुष्यातील खास अनुभूती म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या जिवलग मित्राच्या बाजूला झोपी जाता. आणि सकाळी तिच्यासोबत उठता. तो पुढे म्हणाला की, प्रेमासमोर अहंकार टिकू शकत नाही हे सत्य आहे. कारण प्रेमापेक्षा मोठं काहीही नाही. नव्याला पहिल्याच नजरेत पाहून माझ्या मनात लग्नाचा विचार आला होता.असंही आदित्यने कबुल केलं आहे. भूतकाळाबाबत सांगताना तो म्हणाला, ‘‘आपण कदाचित विसरतो की, आपल्या आजूबाजूला असे काही लोक आहेत जे आपल्या जोडीदाराला भूतकाळाची आठवण करुन देतात. ज्यांना आपण आपल्या हृदयाच्या एका कोपऱ्यात लपवून ठेवतो. पण माझा असा विश्वास आहे की, प्रत्येक नातेसंबंधात प्रामाणिक राहणं आणि स्पष्टपणे बोलणं खूप महत्वाचं आहे.

News18

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत लग्नाआधी आदित्य लालसोबत बराच काळ रिलेशनशिपमध्ये होती. रिपोर्ट्सनुसार, मीरा आणि आदित्यचं अफेअर दिल्लीच्या वसंत व्हॅली स्कूलमध्ये शिकत असताना सुरु झालं होतं. असं म्हटलं जातं की, काही काळ दोघांचं नातं चांगलं होतं, पण नंतर दोघांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. यानंतर आदित्य उच्च शिक्षणासाठी लंडनला गेला. आदित्य लंडनहून परतल्यानंतर बॉलिवूडमध्ये करिअर करण्याचा प्रयत्न करु लागला होता. इतकंच नव्हे तर रिपोर्ट्सच्या मते, आदित्यने पुन्हा मीरासोबत रिलेशनशिपमध्ये येण्याचा प्रयत्न केला होता. पण तिने नकार दिला आणि त्यानंतर मीराच्या आयुष्यात शाहिद कपूरची एन्ट्री झाली होती. पुढे या दोघांनी लग्न करत संसार थाटला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात