पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानने 2017 मध्ये शाहरुख खानच्या 'रईस' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटात दोघांची ऑन-स्क्रीन जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. इतकंच नव्हे तर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सेमी हिट ठरला होता.
फारच कमी लोकांना माहित असेल की, माहिरा शाहरुखसोबत रोमँटिक सीन शूट करायला घाबरली होती. त्यामुळे 'जालिमा' गाण्याच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्याने मर्यादा ठेऊन फक्त नोज टू नोज किसिंग सीन घेतला होता.
माहिराने नुकतंच सांगितलं होतं की, शाहरुख 'रईस'च्या शूटिंगदरम्यान तिला चिडवायचा कारण ती त्याला त्यांच्या रोमँटिक सीनदरम्यान काही गोष्टी करण्यापासून रोखत असे.
'ऑल अबाऊट मूव्हीज विथ अनुपमा चोप्रा' या पॉडकास्टच्या नव्या एपिसोडमध्ये माहिरा म्हणाली, 'जेव्हा आम्ही जालिमाचे शूटिंग करत होतो. तेव्हा ते सर्व माझी चेष्टा करायचे कारण मला भीती वाटत होती की, काहीतरी होईल . मी नेहमी म्हणायचे की, तू मला इथे किस करू शकत नाहीस किंवा तू हे करू शकत नाहीस.
माहिराने सांगितलं की, शाहरुख अनेकदा तिला चेष्टेने चिडवायचा. तो मला चिडवायचा, 'अरे माहितेय पुढचा सीन कोणता आहे.' त्यांच्या निर्बंधांमुळे 'जालिमा' गाण्याच्या हुकवर स्टेपवर माहिरा आणि शाहरुखने काय करावे, याबाबत निर्माते संभ्रमात होते. अखेर सर्वांनी एक मोठा निर्णय घेतला आणि 'नोज टु नोज' किस करण्याचा निर्णय घेतला होता.
माहिरा पुढे म्हणाली, 'जालिमा' गाण्यात हुक स्टेपवर काय करायचं हे आम्हाला कळत नव्हतं. त्यामुळे आणखी काही होऊ शकत नाही, 'नोज टू नोज' किस करु या, असा विनोद झाला आणि तेच सीनमध्ये करण्यात आलं होतं.
2016 च्या उरी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे या कलाकारांना भारतात बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे माहिराचं बॉलिवूड करिअर इथेच संपुष्ठात आलं होतं.