जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / ‘अरे हा तर देसी बॅटमॅन...’; शाहिद कपूरचा अजब मास्क तुम्ही पाहिला का?

‘अरे हा तर देसी बॅटमॅन...’; शाहिद कपूरचा अजब मास्क तुम्ही पाहिला का?

‘अरे हा तर देसी बॅटमॅन...’; शाहिद कपूरचा अजब मास्क तुम्ही पाहिला का?

अभिनेता शाहिद कपूरच्या (Shahid Kapoor) मास्कनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. या मास्कची तुलना चक्क सुपरहिरो बॅटमॅनच्या मास्कशी केली जात आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 1 एप्रिल**:** देशभरातील लोक सध्या वाढत्या कोरोनामुळं (coronavirus) त्रस्त आहेत. सरकारनं देखील वाढत्या संक्रमणाला रोखण्यासाठी काही निर्बंध जारी केले आहेत. शिवाय वैद्यकिय तज्ज्ञ कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी मास्क वापरण्याचा सल्ला देत आहेत. त्यामुळं सध्या बाजारात विविध प्रकारचे मास्क पाहायला मिळत आहे. (coronavirus masks) अगदी 10 रुपयांच्या युज अँड थ्रो मास्कपासून हजारो रुपयांच्या ब्रँडेड मास्क पर्यंत विविध प्रकारचे पर्याय आज उपलब्ध आहेत. मात्र असं असताना देखील अभिनेता शाहिद कपूरच्या (Shahid Kapoor) मास्कनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. या मास्कची तुलना चक्क सुपरहिरो बॅटमॅनच्या मास्कशी केली जात आहे. शाहिद कपूरचा विमानतळावर काढला गेलेला फोटो सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये त्यानं वेगळ्याच प्रकारचा मास्क घातलेला दिसत आहे. याला थ्री लेअर प्रोटेक्शन मास्क असं म्हणतात. हा मास्क तुमच्या संपूर्ण चेहऱ्याचं रक्षण करतो. या मास्कच्या पहिल्या लेअरवर एक उत्तम प्रतिचा कपडा असतो. त्यावर प्लास्टिकचं आवरण असतं. आणि त्यावर प्लास्टिकचा चष्मा लावला जातो. साधारणपणे असा मास्क अभिनेता ख्रिश्चन बेलच्या द डार्क नाईट या चित्रपटात सुपरहिरो बॅटमॅननं परिधान केला होता. लोकांपासून स्वत:चा चेहरा लपवण्यासाठी बॅटमॅन अशा प्रकारचा मास्क वापरतो. या पार्श्वभूमीवर शाहिदच्य मास्कची तुलना सध्या बॅटमॅन मास्कशी केली जात आहे. अवश्य पाहा - लग्न केल्यामुळं संपलं करिअर; बेरोजगार अभिनेत्री शोधतेय काम करोनामुळे राज्यात 227 मृत्यूंची नोंद राज्यात दिवसेंदिवस करोनामुळे परिस्थिती अधिकाधिक चिंताजनक होऊ लागली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये नवे करोनाबाधित सापडण्याचं प्रमाण वाढलेलं असताना आता Covid-19 मुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये देखील मोठी वाढ दिसू लागली आहे. बुधवारी दिवसभरात राज्यात तब्बल 227 कोविड रुग्णांचा मृत्यू झाल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. आरोग्य विभागाने जारी केलेल्या रोजच्या अहवालानुसार या मृतांसोबत राज्याचा मृत्यूदर 1.94 टक्के इतका झाला आहे. त्याचसोबत दुसरीकडे 39 हजार 544 नवे करोनाबाधित सापडले आहेत. आज दिवसभरात 23 हजार 60 रुग्ण बरे होऊन घरी परतले असले, तरी राज्याचा एकूण Recovery Rate 85.34 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात