नवी दिल्ली, 15 जानेवारी: जर्सी (Jersey) स्टार अभिनेता शाहिद कपूरने (Shahid Kapoor) त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. जी सध्या खूप व्हायरल होत आहे. खरं तर, या पोस्टमध्ये शाहिद कपूरने पत्नी मीरा राजपूतबद्दल (Mira Rajput)एक विचित्र खुलासा केला आहे. आपल्या पोस्टमध्ये मीराबद्दल खुलासा करताना शाहिदने तिचे पहिले प्रेम कोण आहे. हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. बॉलीवूडमधील क्यूट कपलपैकी एक कपल म्हणचे शाहिद आणि मीरा. सध्या दोघे पंजाबमध्ये असून तिथे विंटर्स एन्जॉय करताना दिसत आहेत. दरम्यान, शाहिद काही तासंपूर्वीच पत्नीसोबत एक व्हिडीओ शेअर केला आहे. . या व्हिडीओमध्ये दोघे जॉगिंगसाठी बाहेर पडल्याचे दिसत आहे. ब्लॅक अँड व्हाईट व्हिडिओ शेअर करत शाहिदने पत्नी मीराच्या पहिल्या प्रेमाबद्दल भाष्य केले आहे. व्हिडिओमध्ये शाहिद आणि मीरा नेहमीप्रमाणेच खूप स्टायलिश दिसत आहेत. दोघांनी जॅकेट घातलेले आहे. याच दरम्यान, शाहिदने ‘मी मीराचे पहिले प्रेम नाही तर ती ज्याच्याकडे पाहत आहे. ते तिचे पहिले प्रेम आहे. पण तिचं दुसरं प्रेम मी आहे. याचा मला खूप आनंद होत आहे.’ अशी भावना व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये व्यक्त केली आहे.
मात्र, मीराने शाहिदच्या या वक्तव्यावर ‘असे नाही, तू माझे पहिले प्रेम आहेस’. अशी रिअॅक्शन दिली आहे. शाहिद आणि मीराचा हा ब्लॅक अँड व्हाईट व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओला शाहिदने जर्सी चित्रपटातील ‘बिन तेरे क्या यारा मेरा, साहिबा तो मैं मिर्झा तेरा’ या गाण्याची जोड दिली आहे.