मुंबई, 12 फेब्रुवारी- ‘देसी वाईब्स विथ शहनाज गिल’ या शोमधून शहनाज गिल सर्वांच्या भेटीला येते. या शोमध्ये अनेक बॉलिवूड कलाकार सहभागी होतात. यामध्ये शेहनाज त्यांच्यासोबत व्यावसायिक आयुष्यापासून ते खाजगी आयुष्यापर्यंत संवाद साधते. दरम्यान अभिनेता शाहिद कपूर शहनाजच्या या शोमध्ये सहभागी झाला होता. जेव्हा शाहिद कपूर ‘कबीर सिंह’ स्टाईलमध्ये शहनाज गिलच्या या शोमध्ये पोहोचला तेव्हा अभिनेत्रीने सांगितले की, 2015 मध्ये मीरा राजपूतसोबत लग्न करुन तू तुझ्यावर क्रश असणाऱ्या अनेक मुलींची मनं तोडली होतीस. तसेच शहनाज गिलने आपल्या खास अंदाजात शाहिद कपूरला विचारले की तू आपल्या पत्नीशी प्रामाणिक आहेस का? तेव्हा दोघांनी नातेसंबंध आणि मुला-मुलींचे विचार आणि स्वभाव यावर गप्पा मारल्या. या शोचे व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत. शोमध्ये शाहिदने आपले म्हणणे अशा प्रकारे ठेवले की, शहनाजला वाटू लागले की ‘कबीर सिंग’चं पात्र अभिनेत्याच्या अंगात संचारलं आहे. मीरा राजपूतसोबत लग्न केल्यानंतर ज्या मुलींचा हार्टब्रेक झाला होता त्यांची शाहिदने माफी मागितली. शाहिदची माफी मागण्याची स्टाईल अशी होती की, शहनाजला म्हणावं लागलं की, ‘ही एक विचित्र प्रतिक्रिया होती, मी घाबरले’’. यावर उत्तर देत शाहिदने म्हटलं ‘मला सॉरी म्हणावं लागेल,कारण मी परत जाऊ शकत नाही. आणि घडलेल्या गोष्टी दुरुस्त करु शकत नाही. आता खूप उशीर झाला आहे. असं म्हणत शाहिद आपलं मत मांडतो. (हे वाचा: Tina Ambani Birthday:‘त्या’ घटनेने टीना मुनीम-अनिल अंबानींना आणलं जवळ; फिल्मी आहे Love Story ) शहनाज नेहमीप्रमाणे आपल्या चातुर्याने शाहिद कपूरला इथे शब्दात पकडते आणि म्हणते, ‘खूप उशीर झाला, याचा अर्थ काय? तू प्रामाणिक आहेस का?’ यावर शाहिद त्याच्या स्पष्टीकरणात म्हणतो, ‘येथे मला प्रश्न विचारायचा होता. तू माझ्यावर शंका घेत आहेस का? तुला विश्वास नाही? मुली नेहमी असेच प्रश्न का विचारतात, थेट प्रश्न कधीच विचारत नाहीत. यावर दोघंही हसू लागतात.
शाहिदसमोर शहनाजही मुलांबद्दलच्या आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्त करते, “आजकाल आपला मुलांवरचा विश्वास कमी झाला आहे.” असं शहनाज म्हणते. यावर लगेचच शाहीद मुलांच्या बाजूने बोलतो, “मग आम्ही मुलांनी मुलींवर विश्वास का ठेवायचा?” यावर शहनाज मुलींची खासियत सांगत म्हणते, ‘मुली चांगल्या असतात, सकारात्मक असतात.’
मुली संशय का घेतात? शाहिद आपलं म्हणणं पुढे करत म्हणतो,मुलीं खासियत आहेत, तर मुली संशय का घेतात? शाहिद मग विचारतो की मुलं वाईट आहेत का? यावर उत्तर शहनाजने सांगितलं की, मुलं नेहमीच असं वागतात, अशा काही गोष्टी करतात की मुली त्यांच्यावर संशय घेऊ लागतात. यावर शाहिद म्हणतो की मग तुम्ही मुलगी शोधा आणि मुलींनी मुलांच्या मागे धावणं सोडून द्या आणि मुलींनी फक्त मुलींशीच मैत्री करा. तुम्ही मुलांमध्ये रस का दाखवता? यावर शहनाज म्हणते, ‘माझ्याकडे पर्याय नाही’.आणि परत दोघेही हसू लागतात.