टीना मुनीम यांच्या व्यावसायिक आयुष्याबाबत अनेकांना माहिती आहे. परंतु अनेक लोक त्यांच्या खाजगी आयुष्याबाबत जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात.
टीना मुनीम यांच्या खाजगी आयुष्याबाबत सांगायचं झालं तर त्यांनी उद्योगपती अनिल अंबानी यांच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे.
अनिल अंबानींनी एका फॅमिली फंक्शनमध्ये टीना यांना पहिल्यांदा पाहिलं होतं. पाहताच क्षणी ते त्यांच्या प्रेमात पडले होते.
त्यांनतर त्यांच्यात बोलणं सुरु झालं. टीनासुद्धा त्यांच्यावर प्रचंड प्रेम करत होत्या. दरम्यान काही कौटुंबिक कारणाने या दोघांनीही एकमेकांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला.
परंतु १९८९ मध्ये अमेरिकेतील, लॉस अँजेलिसमध्ये मोठा भूकंप झाला होता. यावेळी टीना त्याठिकाणी होत्या. अनिल यांनी मोठ्या प्रयत्नांनी फोन नंबर मिळवून टीना ठीक आहेत का? जाणून घेण्यासाठी त्यांना फोन केला. आणि फक्त तुम्ही कशा आहात? इतकंच विचारुन फोन ठेवला.
टीनासुद्धा त्यांच्या या प्रेमाने आणि काळजीने थक्क झाल्या. त्यांनी परत अनिल यांच्याशी बोलणं सुरु केलं. आणि पुढे एकेमकांच्या कुटुंबाच्या संमतीने त्यांनी लग्नगाठ बांधली.