सुहाना खानचे हे नवीन फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. 21 वर्षीय स्टार किड्स सुहाना तिच्या मित्रांसोबत वेळ घालवताना या फोटोंमध्ये दिसत आहे. शाहरुख खान आणि गौरी खानची मुलगी सुहाना खान सध्या अमेरिकेत आहे, तिथं ती उच्च शिक्षण घेत आहे.
व्हायरल होत असलेल्या या फोटोंमध्ये सुहानाने ब्लॅक कलरचा ड्रेस घातलेला आहे. फोटोंमध्ये ती रेस्टॉरंटमध्ये हसताना आणि मित्रांसह गप्पा मारताना दिसत आहे.
सुहाना खानचे चाहते फोटोंवर कमेंट करून तिला ख्रिसमसच्या शुभेच्छा देत आहेत. हे फोटो लेटेस्ट आहेत. पण कधीचे आहेत याची पुष्टी झालेली नाही.
सुहाना न्यूयॉर्क विद्यापीठाच्या टिश स्कूल ऑफ आर्ट्सची विद्यार्थिनी आहे. सुहानाने गेल्या महिन्यात न्यूयॉर्क सोडण्याचे संकेत दिले होते.
इन्स्टाग्रामवर सुहानाने चालत्या ट्रकचा ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये लिहिले आहे की, 'काळजी करू नका. जरी तुम्ही न्यूयॉर्क सोडले तरी तुम्ही नेहमीच न्यूयॉर्कर राहाल.
सुहानाच्या मैत्रिणींनी तिच्या निरोपावर प्रतिक्रिया दिली होती. एक मित्र लिहितो, 'तू खूप छान काम करणार आहेस.' दुसरा लिहितो, 'शुभेच्छा मुलगी!' दुसरा मित्र तिच्या जाण्याबाबत म्हणतो, 'माझा तर विश्वास बसत नाही.'
सुहानाने ब्लॅक अँड व्हाइट फोटोंचा एक कोलाजही शेअर केला आहे, ज्यामध्ये ती वडील शाहरुख आणि भाऊ आर्यन खानसोबत दिसत आहे.