मुंबई, 2 नोव्हेंबर : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आज त्याचा 57 वा वाढदिवस साजरा करत आहे**.** शाहरुखचा वाढदिवस त्याच्या चाहत्यांसाठी एखाद्या सणापेक्षा कमी नाही. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शाहरुख खानच्या घराबाहेर चाहते मोठ्या संख्येने पाहायला मिळाले. आज सोशल मीडियावर सगळीकडे शाहरुख खानच दिसत असून त्याच्यावर भरभरुन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सगळीकडे एसआरकेच्या वाढदिवसाची धूम असताना त्यानं चाहत्यांना मोठं सरप्राईज दिलं आहे. यामुळे त्याच्या चाहत्यांना एक सुखद धक्का बसलाय. शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित ‘पठान’ या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. शाहरुखने टीझरचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे. तुमच्या खुर्चीचा पट्टा बांधा… पठाणचा टीझर रिलीज झाला आहे. टीझरमध्ये जबरदस्त अॅक्शन पहायला मिळतेय. शिवाय जॉन अब्राहम आणि शाहरुखची हटके भूमिका पाहून चित्रपटाची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोण धमाकेदार एन्ट्रीही टीझरमध्ये पहायला मिळतेय. एकंदरीत फूल पॅकेज सिनेमा असल्याचा अंदाज टीझरवरुन लावला जाऊ शकतो की शकतो.
टीझरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. शाहरुख खानचा पठाण चित्रपट पुढील वर्षी 25 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरुख खानसोबत जॉन अब्राहम, दीपिका पदुकोण देखील दिसणार आहे तसेच सलमान खान देखील दिसणार आहे. या तिघांना पाहण्यासाठी त्यांचे चाहते कमालीचे उत्सुक आहेत. पठान व्यतिरिक्त शाहरुख खान विजय सेतुपती आणि नयनतारा यांच्या ‘अटली का जवान’ मध्ये देखील आहे. याशिवाय अभिनेत्याकडे तापसी पन्नूसोबत राजकुमार हिरानीचा ‘डंकी’ सिनेमाही आहे.
दरम्यान, दिल्लीतील एक साधा दिसणारा मुलगा बॉलिवूडचा बादशाह बनला आहे. ही कथा चित्रपटाची नसून खरी आहे आणि तो मुलगा दुसरा कोणी नसून शाहरुख खान आहे. आज त्याचे असंख्य चाहते असून तो प्रत्येकाच्या मनावर राज्य करतो असं म्हणायला हरकच नाही. चाहत्यांचं त्याच्याविषयीचं प्रेम दिवसेंदिवस वाढतच चाललेलं पहायला मिळतंय