मुंबई, 1 डिसेंबर: इंडियन प्रीमियर लीग (IPL) आणि कॅरिबियन प्रीमियर लीग (CPL) नंतर किंग खान शाहरुख खान (Shah Rukh Khan) यूएस टी -20 लीगमध्ये प्रवेश करण्याची तयारी दर्शविली आहे. मुंबई मिररच्या वृत्तानुसार, कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आणि ट्रिनबॅगो नाइट रायडर्सनंतर शाहरुखने लॉस एंजेलिसची फ्रँचायझी खरेदी केली असून त्याचे नाव लॉस एंजेलिस नाइट रायडर्स ठेवले आहे. आयपीएलच्या धर्तीवर असणारी ही लीग लवकरच अमेरिकेत सुरू होणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार या लीगमध्ये 6 टीम्स असतील आणि सॅन फ्रान्सिस्को, वॉशिंग्टन डीसी, शिकागो, डॅलस, न्यूयॉर्क आणि लॉस एंजेलिस या शहरांवरुन त्यांची नावं ठरवली जातील. किंग खानच्या कोलकाताने दोन वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे, तर ट्रिनबागोने चार वेळा कॅरेबियन लीग जिंकला आहे. असा घेतला निर्णय शाहरुख खानने दिलेल्या मुलाखतीत शाहरुख सांगितलं की, मी जागतिक पातळीवर नाईट रायडर्सच्या फ्रँचायझीमध्ये वाढ करण्याची संधी शोधत होतो, टी -20 लीगचे आयोजक अमेरिकेत सुरू व्हावेत यासाठी मी आणि माझे काही सहकारी प्रयत्न करीत होतो आणि आता मी लॉस एंजेलिसची फ्रँचायझी खरेदी केली आहे. आयपीएलचा 15 वा हंगाम संपल्यानंतर 2022 मध्ये अमेरिकन टी -20 लीगचे आयोजन केले जाऊ शकतं. कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर शाहरुख सध्या पठाण सिनेमाचं शूटिंग करत आहे. त्यानंतर या अभिनेत्याकडे राजकुमार हिरानी आणि एका दाक्षिणात्य फिल्ममेकरच्या सिनेमाचाही ऑफर आहे. शाहरुख खान पहिल्यांदाच साऊथ इंडियन दिग्दर्शक एलटी यांच्यासोबत काम करणार आहे. या सिनेमामध्ये शाहरुखचा डबल रोल असेल. या आधी त्याने ड्युप्लीकेट आणि डॉन या सिनेमांमध्ये डबल रोल साकारला होता. यामध्ये शाहरुख मुलगा आणि वडीलांची भूमिका साकारणार आहे.’ 2 पिढ्यांमधील अंतर’ हा विषय या सिनेमामध्ये हाताळला जाणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.