मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /घरासमोर बाबांचं 'ओले ओले' गाणं ऐकून तैमूर झाला खूश; पाहा VIDEO मध्ये कशी दिली रिअॅक्शन

घरासमोर बाबांचं 'ओले ओले' गाणं ऐकून तैमूर झाला खूश; पाहा VIDEO मध्ये कशी दिली रिअॅक्शन

या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे, हे गोसेवक सैफ अली खानच्या फॉर्च्यून हाइट्स या घरासमोर थांबले.

या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे, हे गोसेवक सैफ अली खानच्या फॉर्च्यून हाइट्स या घरासमोर थांबले.

या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे, हे गोसेवक सैफ अली खानच्या फॉर्च्यून हाइट्स या घरासमोर थांबले.

मुंबई, 16 जानेवारी : बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) यांचा मुलगा तैमूर अली खान(Taimur Ali Khan)  आपल्या गोंडसपणामुळे मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे. सोशल मीडिया आणि टीव्ही चॅनेल्सवर देखील तैमूर मोठ्या प्रमाणात दिसत असतो. नुकताच त्याचा एक नवीन व्हिडीओ समोर आला असून, यामध्ये तो गोमाता सेवकांनी वाजवलेलं गाणं पाहून थक्क होतो.

या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे, हे गोसेवक सैफ अली खानच्या फॉर्च्यून हाइट्स या घरासमोर थांबले. यावेळी ते 'हम साथ साथ हैं' या चित्रपटातील 'ये सच है क्या भगवान है' हे गाणं पिपाणीतून वाजवत होते. पण त्यांनी तैमूरला पाहिल्यानंतर ते सैफ अली खानचं ये दिल्लगी चित्रपटातलं ' जब भी कोई लडकी देखूँ मेरा दिल दीवाना बोले ओले ओले ओले ओले ओले ओले' हे गाणं वाजवण्यास सुरुवात करतात. इथं गोसेवकांचं प्रसंगावधान पण वाखाणण्यासारखं आहे कारण त्यांना जरी हे माहीत असलं की हे सैफ अली खानचं घर आहे तरीही त्याच्या मुलासमोर त्याच्याच चित्रपटातली सुप्रसिद्ध गाणी वाजवणं हे प्रसंगावधान कौतुकास्पद आहे.

हे ही वाचा-...आणि म्हणून करिष्मा कपूरने 10.11 कोटींना विकला तिचा मुंबईतील फ्लॅट

तैमूरने पहिलं गाणं ओळखलं नाही मग त्याला ओळखता येईल असं गाणं वाजवलं. तैमूरने ओले ओले गाणं ऐकल्यावर त्याच्या चेहऱ्यावर ओळखीचं गाणं वाजल्याचे भाव दिसले. यावेळी त्याला थांबलेले पाहून अनेकजण त्याचे फोटो काढत होते. यामध्ये तो फोटो काढू नका असे हाताने सांगतो.  याचवेळी गोसेवक गाणे वाजवायचे थांबवतात. पण तैमूर त्यांना 'अजून वाजवा' असे म्हणतो. याचाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याचबरोबर तैमूरने घातलेल्या कपड्यांची देखील खूप चर्चा होत आहे. या व्हिडिओमध्ये त्याने भगव्या रंगाचे टी-शर्ट घातले असून यावर मगरीचे छायाचित्र आहे.  तैमूर हा खूप लोकप्रिय असून फोटोग्राफर त्याचा सतत पाठलाग करत असतात. अनेकदा तैमूरला त्याचा त्रास होतो. त्यामुळं तो अनेकदा या फोटोग्राफर्स बरोबर खूप विचित्र वागतो.

दरम्यान, करीना कपूर (Kareena Kapoor) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) लवकरच दुसऱ्यांदा आईवडील बनणार आहेत. करीना कपूर प्रेग्नेट असून फेब्रुवारीच्या शेवटी किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात ती आपल्या दुसऱ्या अपत्याला जन्म देणार आहे. यामुळे तैमूर लवकरच मोठा भाऊ बनणार असून नेहमीप्रमाणे या व्हिडीओमध्ये देखील त्याचा दिलखुलास अंदाज दिसून येत आहे.

First published:
top videos

    Tags: Bollywood, Taimur ali khan