मुंबई, 13 जुलै- 1983 मध्ये भारताला वर्ल्ड कप (1983 World Cup) मिळवून देण्यात क्रिकेटर यशपाल शर्माचं (Yashpal Sharma) मोठं योगदान होतं. या रियल हिरोचं काल अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. यावर दुख व्यक्त करत अभिनेता जतिन सरनाने (Jatin Sarna) भावुक पोस्ट शेयर केली आहे. आगामी चित्रपट ‘83’ मध्ये जतिन यशपाल यांची भूमिका साकारत आहे.
सन 1983 च्या वर्ल्ड कपमध्ये क्रिकेटर यशपाल शर्माचं योगदान खुपचं मोठं होतं. त्यांना या वर्ल्ड कपचा हिरोसुद्धा म्हटलं जातं होतं. त्यांची ही सक्सेसस्टोरी मोठ्या पडद्यावर आणण्याचं काम दिग्दर्शक कबीर खान हे करत आहेत. आणि यामध्ये यशपाल शर्माची भूमिका ‘सेक्रेड गेम’ फेम अभिनेता जतिन सरना साकारत आहे. चित्रपटाचं शुटींग पूर्ण झालं आहे. मात्र कोरोना महामारीमुळे तो प्रदर्शित होऊ शकला नाहीय.
View this post on Instagram
जतिनने आपल्या इन्स्टाग्रामवर काही खास फोटो शेयर केले आहेत, यामध्ये तो यशपाल यांच्याकडून क्रिकेटमधील बारकावे शिकताना दिसून येत आहे. हे सुंदर फोटो शेयर करत जतिनने यशपाल यांच्या आठवणीत एक भावुक पोस्टसुद्धा लिहिली आहे. कॅप्शन लिहित जतिननं म्हटलं आहे, ‘सर हे अजिबात योग्य नाहीय, हे बरोबर नाहीय, देवा तू सुद्धा हे चुकीचं केलंस. यशपाल सर मला विश्वास बसत नाहीय, तुम्ही इतक्या लवकर जावू शकता यावर, अजून तर खेळ बाकी होता. अजून आपली मुलाखत बाकी होती. मला तुमच्या घरी यायचं होतं तुम्हाला भेटायला. मला तुमच्यासोबत हा चित्रपट भागायचा होता. तुमचे हावभाव बघायचे होते. यश पा यश पा म्हणून ओरडायचं होतं. आणि सर्वांना दाखवायचं होतं की हा वाघ कोण आहे. सर तुम्ही नेहमीचं आठवणीत राहणार.आणि हा इतिहास तुम्हाला कधीचं नाही विसरणार’. अशी भावुक पोस्ट जतिनने शेयर केली आहे.
(हे वाचा:Mimi Trailer: 'शिल्पा शेट्टी का फिगर खराब हुआ क्या'; सई दिसली दमदार भूमिकेत )
‘83’ या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग माजी कॅप्टन कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाची सर्वांनाचं खूप उत्सुकता आहे. मात्र चित्रपट रिलीज व्हायच्या आधीचं यशपाल यांचं निधन झाल्याने दुख व्यक्त केल जातं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Entertainment