मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Indian Idol मध्ये उमलतंय नवं प्रेम? सायली कांबळे पडली या गायकाच्या प्रेमात

Indian Idol मध्ये उमलतंय नवं प्रेम? सायली कांबळे पडली या गायकाच्या प्रेमात

सायलीनं व्यक्त केलं या गायकावरील प्रेम; व्हिडीओ पाहून होतेय जोरदार टीका

सायलीनं व्यक्त केलं या गायकावरील प्रेम; व्हिडीओ पाहून होतेय जोरदार टीका

सायलीनं व्यक्त केलं या गायकावरील प्रेम; व्हिडीओ पाहून होतेय जोरदार टीका

मुंबई 30 मे: इंडियन आयडल (Indian Idol) हा छोट्या पडद्यावरील सध्याचा सर्वाधिक चर्चेत असलेला संगीत शो आहे. या शोमध्ये गाण्यांसोबतच ग्लॅमर आणि लव्ह स्टोरीचा तडका दिला जात आहे. शोमधील स्पर्धकांची प्रेम प्रकरणं सातत्यानं बाहेर येत आहेत. अर्थात यामधील काही प्रकरणं ही बनावटी स्परुपाची असल्याचं सिद्ध झालंय. पण तरी देखील इंडियन आयडलच्या मंचावर आता नवीचं प्रेम प्रकरण उमलताना दिसत आहे. मराठमोळी गायिका सायली कांबळे (Sayli Kamble) गायक निहालच्या (Nihal Tauro) प्रेमात असल्याचं दाखवलं जातं आहे. सायलीनं स्वत: त्याच्यावरील प्रेम व्यक्त केलं आहे. (Sayli Nihal Love story)

सोनी वाहिनीनं इंडियन आयडलच्या नव्या भागाचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये निहाल किशोर कुमार यांचे ‘दिल क्या करे’ हे गाणं गाताना दिसत आहे. मात्र त्याच्या सादरीकरणानंतर होस्ट आदित्य नारायण म्हणतो... जेव्हा निहाल गात होता तेव्हा सयाली देखील संपूर्ण गाणं गुणगुणत होती. यावर सयाली म्हणते की, आम्ही दोघेही टॉम आणि जेरीसारखे आहोत आणि माझे त्याच्यावर प्रेम आहे. यानंतर निहाल म्हणतो की, सायली नेहमीच त्याची गाण्यात मदत करते. यावर सायली म्हणते की, हा भाग जरी गर्ल्स व्हर्सेस बॉईजचा असला, तरी निहालचे सादरीकरण चांगलंच होणार अशी मला खात्री होती. दोघांचे अनुभव ऐकून परिक्षकांसह सर्व स्पर्धकांनी टाळ्यांचा आणि शिट्ट्यांचा कडकडाट केला. या भागात अनु मलिक मुलींच्या टीमचे कॅप्टन होते. मनोज मुंटाशीर ‘बॉईज’ संघाचे कॅप्टन होते.

परेश रावल पडले होते ब्रोशर वाटणाऱ्या तरुणीच्या प्रेमात; पाहा त्यांची अनोखी Love story

इंडियन आयडलचा हा नवा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही जणांनी प्रेम व्यक्त केल्या बद्दल सायली कांबळेचं कौतुक केलं आहे. तर काहींनी मात्र टीका केली आहे. हा केवळ इंडियन आयडलचा पब्लिसीटी स्टंट आहे. यापूर्वी देखील त्यांनी अशी खोटी प्रेम प्रकरणं उभी केली होती अशी टीका केली जात आहे. आता सायलीचं हे प्रेम प्रकरण खरं आहे की खोटं हे येत्या भागात सिद्ध होईल. मात्र या अशा प्रकारांमुळं शोच्या टीआरपीमध्ये काहीशी वाढ नक्कीच झाली आहे.

First published:

Tags: Indian idol, Love story, Song