जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Gosht Eka Paithanichi : राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारा 'गोष्ट एका पैठणीची' चित्रपट 'या' दिवशी होणार प्रदर्शित

Gosht Eka Paithanichi : राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारा 'गोष्ट एका पैठणीची' चित्रपट 'या' दिवशी होणार प्रदर्शित

 'गोष्ट एका पैठणीची'

'गोष्ट एका पैठणीची'

अभिनेत्री सायली संजीवचं या चित्रपटातील भूमिकेसाठी खूपच कौतुक झालं होतं. तेव्हापासून हा चित्रपट कधी पाहता येणार याची प्रेक्षकांना उत्सुकता होती. आता त्यांची प्रतीक्षा संपणार आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 30 सप्टेंबर : अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर यावर्षी अनेक मराठी चित्रपट आणि कलाकारांनीही आपलं नाव कोरलं. त्यात सगळ्यात जास्त चर्चा झाली ती सायली संजीव मुख्य भूमिकेत असलेल्या  ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटातची. अभिनेत्री सायली संजीव आणि अभिनेता शशांक केतकर याच्या भूमिका असेलल्या ‘गोष्ट एका पैठणीची’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुसस्कार जाहीर झाला. आता हा चित्रपट प्रेक्षकांना सुद्धा लवकरच बघता येणार आहे. अभिनेत्री सायली संजीवचं  या चित्रपटातील भूमिकेसाठी खूपच कौतुक झालं होतं. हा पुरस्कार मिळाल्यानंतर ती भावुक झाली होती. तेव्हापासून हा चित्रपट कधी पाहता येणार याची प्रेक्षकांना उत्सुकता होती. आता त्यांची प्रतीक्षा संपणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे. हेही वाचा - Sahela re movie: ‘नातं जुनं…नवा कनेक्ट’; मृणाल कुलकर्णींचा ‘सहेला रे’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला 68 व्या राष्ट्रीय पुरस्कारात शंतनू रोडे दिग्दर्शित ‘गोष्ट एका पैठणीची’ने ‘सर्वोत्कृष्ट चित्रपटा’चा पुरस्कार पटकावला असून  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या खास दिनाचे औचित्य साधून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. येत्या 2 डिसेंबर रोजी ‘गोष्ट एका पैठणीची चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

जाहिरात

अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी, गोल्डन रेशो फिल्म्स आणि लेकसाईड प्रॉडक्शन प्रस्तुत या चित्रपटात सायली संजीव, सुव्रत जोशी, मृणाल कुलकर्णी, मिलिंद गुणाजी, शशांक केतकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

News18लोकमत
News18लोकमत

चित्रपटाला मिळालेल्या यशाबद्दल दिग्दर्शक शंतनू रोडे म्हणतात, ’’ आज या चित्रपटासाठी आम्हाला राष्ट्रीय पुरस्कार मिळत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनासाची तारीख जाहीर करण्यासाठी आजच्यापेक्षा दुसरा कोणता चांगला दिवस असूच शकत नाही. हा चित्रपट माझ्या खूप जवळचा आहे. एका छोट्याशा गावात घडणारी ही गोड कथा आहे. चित्रपट बनवला तेव्हा हा चित्रपट राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत मजल मारेल, याची जराही कल्पना नव्हती. प्रत्येक जण आपल्या उराशी एक स्वप्न बाळगून असतो आणि त्या स्वप्नांनाची पूर्तता करणारा हा नक्षीदार प्रवास म्हणजे ‘गोष्ट एका पैठणीची’. खरंतर या चित्रपटाचा भाग असलेला प्रत्येक व्यक्ती या पुरस्काराचा मानकरी आहे.’’

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात