मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /चर्चा तर होणारच...; सायली संजीवची BOLD दृश्य सोशल मीडियावर व्हायरल

चर्चा तर होणारच...; सायली संजीवची BOLD दृश्य सोशल मीडियावर व्हायरल

अशी परिस्थिती निर्माण होण्याआधीच बाथरुमध्ये जाताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. त्यासाठी  अंगावर गार पाणी घेताना त्याच्या तापमानाचा विचार करायला हवा.

अशी परिस्थिती निर्माण होण्याआधीच बाथरुमध्ये जाताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. त्यासाठी अंगावर गार पाणी घेताना त्याच्या तापमानाचा विचार करायला हवा.

सायलीला आजवर अनेकदा प्रेक्षकांनी सोज्वळ सुनेच्या रुपात पाहिलं आहे. परंतु ही इमेज आता ब्रेक करण्याचा इरादा सायलीनं केला आहे. अन् त्याची सुरुवात तिनं केली ती आपल्या आगामी चित्रपटातून.

मुंबई 13 मार्च: ‘काहे दिया परदेस’ (Kahe Diya Pardes) या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सायली संजीव (Sayali Sanjeev) ही मराठी मनोरंजनसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. सायलीला आजवर अनेकदा प्रेक्षकांनी सोज्वळ सुनेच्या रुपात पाहिलं आहे. परंतु ही इमेज आता ब्रेक करण्याचा इरादा सायलीनं केला आहे. अन् त्याची सुरुवात तिनं केली ती आपल्या आगामी चित्रपटातून.

सायली एक नवा चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या आगामी चित्रपटाचं नाव ‘झिम्मा’ असं आहे. नुकतंच तिनं सोशल मीडियावर या चित्रपटाचा ट्रेलर पोस्ट करुन याबाबत चाहत्यांना माहिती दिली. (Jhimma Teaser) परंतु हा ट्रेलर चित्रपटापेक्षा सायलीच्या बोल्ड दृश्यांमुळं अधिक चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये सायलीचा नेहमीपेक्षा वेगळाच अंदाज पाहायला मिळत आहे. यामध्ये तिनं चक्क बाथ सीन केला आहे. (bathtub scene viral) या सीनमुळं चित्रपटाचा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत हजारो नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया देत सायलीचं कौतुक केलं आहे.

अवश्य पाहा - बॉक्स ऑफिस कलेक्शन ठणठण गोपाळ; जान्हवी कपूरचा ‘रुही’ ठरला सुपरफ्लॉप

‘झिम्मा’ हा चित्रपट येत्या 23 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. हेमंत ढोमे यानं चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटसृष्टी, रंगमंच, टेलिव्हिजन गाजवणारे कलाकार यात पाहायला मिळणार आहेत. क्षिती जोग, सुहास जोशी, मृण्मयी गोडबोले, सुचित्रा बांदेकर, सायली संजीव आणि निर्मिती सावंत या कसलेल्या कलाकारांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. तगड्या कलाकारांची फळी यात असल्यामुळे आता 'झिम्मा'मध्ये काय दडलंय हे लवकरच कळेल.

First published:
top videos

    Tags: Bold photoshoot, Bollywood, Entertainment, Movie shooting, Sayali Sanjeev