मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /बॉक्स ऑफिस कलेक्शन ठणठण गोपाळ; जान्हवी कपूरचा ‘रुही’ ठरला सुपरफ्लॉप

बॉक्स ऑफिस कलेक्शन ठणठण गोपाळ; जान्हवी कपूरचा ‘रुही’ ठरला सुपरफ्लॉप

ह़ॉरर कॉमेडीची जादू ढळली! जान्हवी कपूरच्या रुहीला दोन आकडी कमाई देखील करता आली नाही. पाहा दोन दिवसांचं कलेक्शन

ह़ॉरर कॉमेडीची जादू ढळली! जान्हवी कपूरच्या रुहीला दोन आकडी कमाई देखील करता आली नाही. पाहा दोन दिवसांचं कलेक्शन

ह़ॉरर कॉमेडीची जादू ढळली! जान्हवी कपूरच्या रुहीला दोन आकडी कमाई देखील करता आली नाही. पाहा दोन दिवसांचं कलेक्शन

मुंबई 13 मार्च: जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) आणि राजकुमार राव (Rajkummar Rao) यांच्या दमदार विनोदानं भरलेला रुही (Roohi) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. कोरोनामुळं गेली वर्षभर बंद असलेली सिनेमागृह रुहीच्या निमित्तानं पुन्हा एकदा सुरु झाली. मात्र या चित्रपटाला प्रेक्षक आणि समिक्षकांचा मिश्र प्रसिसाद मिळत आहे. परिणामी चित्रपटानं दोन दिवसात केवळ 5 कोटी 31 लाख रुपयांची कमाई केली आहे.

ब्लॉकबस्टर स्त्री या चित्रपटाचं दिग्दर्शन करणाऱ्या Hardik Mehta यानंच रुहीची निर्मिती केली आहे. त्यामुळं गेली अनेक महिने हा चित्रपट चर्चेत होता. जबरदस्त ट्रेलर आणि जान्हवीचा आयटम सॉग प्रदर्शित झाल्यानंतर तर प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली होती. हा चित्रपट देखील स्त्री प्रमाणेच विनोदानं भरलेला आणि आश्चर्यचकित करणाऱ्या ट्विस्टमधून अवाक करणारा असेल अशी अपेक्षा प्रेक्षकांची होती. परंतु ही अपेक्षा काहीशी फोल ठरली. अन् याचा थेट परिणाम चित्रपटाच्या कमाईवर झाला आहे.

अवश्य पाहा - ना दीपिका ना अनुष्का... या अभिनेत्रीनं मारली बाजी; आदिपुरुषमध्ये साकारणार सीता

" isDesktop="true" id="530219" >

11 मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. पहिल्या दिवशी 3.06 कोटी रुपयांची ओपनिंग मिळाली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रेक्षकांचा प्रतिसाद आणखी कमी झाल्यामुळं केवळ 2.55 कोटी रुपये इतकंच कलेक्शन रुही करु शकला. दरम्यान येत्या शनिवारी आणि रविवारी चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा निर्माते करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Bollywood, Entertainment, Janhavi kapoor, Movie release, Movie review, Rajkumar rao, Sharma