जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Satya Prem Ki Katha: पुन्हा पडद्यावर कार्तिक-कियाराचा रोमान्स; 'सत्य प्रेम की कथा'चा जबरदस्त टीजर रिलीज

Satya Prem Ki Katha: पुन्हा पडद्यावर कार्तिक-कियाराचा रोमान्स; 'सत्य प्रेम की कथा'चा जबरदस्त टीजर रिलीज

सत्यप्रेम की कथा टीजर रिलीज

सत्यप्रेम की कथा टीजर रिलीज

Satya Prem Ki Katha Teaser Out: कियारा अडवाणी आणि कार्तिक आर्यनने नुकतंच आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला आहे.

  • -MIN READ Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 18 मे- बॉलिवूडमधील काही कलाकारांच्या जोड्या प्रेक्षकांना प्रचंड आवडल्या होत्या. त्यातीलच एक गोड जोडी म्हणजे कियारा अडवाणी आणि कार्तिक आर्यन याची होय.या दोघांनी हॉरर-कॉमेडी चित्रपट ‘भूल भुलैया 2’ मध्ये एकत्र काम केलं होतं. या चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर हे दोघे आता ‘सत्य प्रेमकी कथा’ या चित्रपटात पुन्हा एकत्र झळकणार आहेत. या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. कार्तिक आणि कियाराला पुन्हा एकत्र पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. या दोघांनी शूटिंगचे अनेक फोटोही शेअर केले होते. दरम्यान आता या चित्रपटाचा टीजर रिलीज झाला आहे. कियारा अडवाणी आणि कार्तिक आर्यनने नुकतंच आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला आहे. या पोस्टमधून त्यांनी आपल्या आगामी ‘सत्य प्रेमकी कथा’ सिनेमाचा जबरदस्त टीजर लॉन्च करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे. या टीजरला सध्या चांगलीच प्रसिद्धी मिळत आहे. टीजरमधील काही सीन प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. या दोघांची केमिस्ट्री पुन्हा एकदा प्रेक्षकांना आवडत असल्याचं दिसून येत आहे. (हे वाचा: Alia Bhatt: रिकामी Gucci बॅग घेऊन विदेशी इव्हेंटमध्ये पोहोचली आलिया, बॅग आणि सँडलची किंमत ऐकूनच फुटेल घाम ) कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणीने हा टीजर शेअर करत एक टॅगलाईनसुद्धा लिहली आहे. यामध्ये लिहलंय, ‘आंसू तेरे हो..पर आँखे मेरी हो’. टीजरमध्येसुद्धा हा डायलॉग ऐकायला मिळत आहे. टीजर पाहून हा एक रोमँटिक ड्रामा चित्रपट असणार हे लक्षात येत आहे. चाहते आणि सेलिब्रेटी या टीजरवर भरभरुन लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत.

जाहिरात

कियारा आणि कार्तिक या दोघांनी देशभरातील विविध दुर्गम ठिकाणी चित्रपटाचं शूटिंग केलं आहे. मोठ्या नैसर्गिक अडचणींचा सामना करत त्यांचं शूट पूर्ण केलं आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाच्या रॅप-अपची घोषणा करत, कियाराने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर सेटवरील एका छोट्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले होते. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड पसंत करण्यात आले होते.

News18लोकमत
News18लोकमत

समीर विद्वांस दिग्दर्शित ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटात कियारा अडवाणी आणि कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. कार्तिक आणि कियारा या दोघांनीही सप्टेंबर 2022 मध्ये चित्रपटाची तयारी सुरु केली होती. हा चित्रपट 29 जून 2023 रोजी चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे. या दोघांव्यतिरिक्त या चित्रपटात गजराज राव आणि सुप्रिया पाठक यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात