मुंबई, 15 जानेवारी: मराठी सिनेसृष्टीत(marathi entertainment) सध्या लग्नसराईची धामधूम सुरु असल्याचं दिसून येत आहे. गायक रोहित राऊत (rohit raut) लवकरच गर्लफ्रेंड गायिका जुईली जोगळेकरशी (juilee joglekar) लग्नगाठ बांधणार आहे. काहीदिवसांपूर्वी त्यांचे केळवणाचे फोटो व्हायरल झाले होते. तर आता जुईलीने स्वतः रोहितसोबत सातफेरे कधी घेणार आहे. याची माहिती अप्रत्यक्षपणे दिली आहे. जुई नेहमी सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असते. तीने बऱ्याच दोघांचे फोटो शेअर केले आहे. आताही तिने रोहितसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. आणि कॅप्शनमध्ये महत्त्वाची माहिती दिली आहे. ‘चला. दहा दिवस बाकी आहेत. ’ असे म्हटले आहे. याचा अर्थ ते दोघे 23 जानेवारीला लग्नबंधनात अडकणार आहेत. अशी माहिती जुईने अप्रत्यक्षपणे दिली आहे.
काही दिवसांपूर्वी, जवळच्या मैत्रिणींनी त्यांच केळवण केलं होत. जुईने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या केळवणाचे फोटो पोस्ट केले होते. गेल्या काही वर्षांपासून रोहित आणि जुईली एकमेकांना डेट करत आहेत. अनेकदा त्यांनी सोशल मीडियावर एकमेकांसोतचे फोटो शेअर करुन प्रेमाची जाहीर कबुलीदेखील दिली होती.
सोशल मीडियावर दिली होती प्रेमाची कबुली 2009 मध्ये झी मराठीवर ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’चा पहिला सीझन आला होता. रोहित राऊत या पहिल्या पवार्चा विजेता ठरला होता. त्यानंतर रोहितने गायक म्हणून सिनेइंडस्ट्रीत स्वत:ची ओळख निर्माण केली. याच शोमध्ये जुईली जोगळेकर ही देखील स्पर्धक म्हणून आली होती. तेव्हापासून रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांची ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर पुढे मैत्रीत झाले आणि मग प्रेमात. दोघांनीही सोशल मीडियावर एकमेकांच्या प्रेमात असल्याची कबुली दिली आहे.

)







