मुंबई,24 मे- या तीन दिवसांत मनोरंजनसृष्टीला धक्का देणारी तिसरी घटना घडली आहे.दोन दिवसांपूर्वी अभिनेत्री सुचिंद्रा दासगुप्ता आणि अभिनेता आदित्य सिंह राजपूत या तरुण कलाकारांचं निधन झालं होतं. आता आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. ‘‘साराभाई वर्सेस साराभाई 2’ या शोमध्ये जस्मिनची भूमिका साकारणारी अभिनेत्री वैभवी उपाध्याय चं मंगळवारी सकाळी निधन झालं आहे. हिमाचल प्रदेशमध्ये एका कार अपघातात वैभवीचा मृत्यू झाला. ती 32 वर्षांची होती. वैभवीचे कुटुंबीय चंदिगडमधून तिचा मृतदेह मुंबईत आणत आहेत. बुधवारी सकाळी 11 वाजता मुंबईत अभिनेत्रीवर अंत्यसंस्कार होणार आहेत.या बातमीने मनोरंजनसृष्टीत शोककळा पसरली आहे. वैभवी उपाध्यायच्या निधनाने संपूर्ण इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. तिच्या निधनाबद्दल चाहत्यांनी शोक व्यक्त केला आहे. ‘साराभाई व्हर्सेस साराभाई 2’ मध्ये वैभवीसोबत काम करणारे निर्माता-अभिनेते जेडी मजेठिया यांनी तिच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, जेडीने टर्न घेत असताना उपाध्याय यांची कार दरीत पडल्याचा खुलासा केला. कारमध्ये वैभवीचा बॉयफ्रेंडसुद्धा होता. त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे. (हे वाचा: Suchandra Dasgupta Death: धक्कादायक! 29 वर्षीय अभिनेत्रीला ट्रकने चिरडले, जागीच मृत्यू ) जेडी मजेठिया यांनी वैभवीच्या मृत्यूबाबत तिच्या भावाशी संवाद साधला. जेडी यांना अश्रू अनावर झाले. त्यांनी सांगितलं की,, “हे अविश्वसनीय, दुःखद आणि धक्कादायक आहे. त्यांचा यावर विश्वास बसत नाही.आयुष्याची शाश्वती नाही’. वैभवी उपाध्यायने टीव्ही शो ‘साराभाई व्हर्सेस साराभाई 2’,शिवाय ‘क्या कसूर है अमला का’, वेब सीरिज ‘प्लीज फाइंड अटॅच्ड’ आणि ‘छपाक’ चित्रपटातही काम केलं आहे. वैभवी उपाध्याय हे गुजराती इंडस्ट्रीतीलसुद्धा एक मोठं नाव होतं. अभिनेत्रीच्या अशा आकस्मिक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.
दोन दिवसांपूर्वी 29 वर्षीय बंगाली अभिनेत्री सुचंद्र दासगुप्ताचंदेखील अपघातात निधन झालं होतं.अभिनेत्री रविवारी रात्री कोलकात्ताहून डनलॉपच्या दिशेने रॅपिडोने पानीहाटी रेल्वे पार्कमधील आपल्या घरी परतत होती. यावेळी बारानगर घोषपाडा रोडजवळ एका दुचाकीने अचानक रस्ता ओलांडला आणि दुचाकीला ब्रेक लागला नाही.अशातच गंभीर अपघात झाला. या अपघाताची तीव्रता इतकी होती की, या अभिनेत्रीचा जागीच मृत्यू झाला.