जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Suchandra Dasgupta Death: धक्कादायक! 29 वर्षीय अभिनेत्रीला ट्रकने चिरडले, जागीच मृत्यू

Suchandra Dasgupta Death: धक्कादायक! 29 वर्षीय अभिनेत्रीला ट्रकने चिरडले, जागीच मृत्यू

अभिनेत्री सुचंद्रा दासगुप्ताचं अपघातात निधन

अभिनेत्री सुचंद्रा दासगुप्ताचं अपघातात निधन

Suchandra Dasgupta Death: मनोरंजनसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्रीचा अपघाती मृत्यू झाला आहे. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे.

  • -MIN READ Maharashtra
  • Last Updated :

मुंबई,21 मे- मनोरंजनसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्रीचा अपघाती मृत्यू झाला आहे. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. अभिनेत्री सुचंद्रा दासगुप्ता असं या अभिनेत्रीचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बारानगरमध्ये सुचंद्र दासगुप्ता यांचा ट्रकने धडक दिल्याने मृत्यू झाला आहे. शनिवारी रात्री शुटिंग आटोपून ही अभिनेत्री आपल्या बाईकने घरी परतत होती. बारानगर पोलिस ठाण्याजवळ, घोषपाडा याठिकाणी आल्यानंतर एका ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये अभिनेत्रीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. 29 वर्षांची अभिनेत्री सुचंद्र दासगुप्ता रविवारी रात्री कोलकात्ताहून डनलॉपच्या दिशेने रॅपिडोने पानीहाटी रेल्वे पार्कमधील आपल्या घरी परतत होती. यावेळी बारानगर घोषपाडा रोडजवळ एका दुचाकीने अचानक रस्ता ओलांडला आणि दुचाकीला ब्रेक लागला नाही.अशातच गंभीर अपघात झाला. या अपघाताची तीव्रता इतकी होती की, या अभिनेत्रीचा जागीच मृत्यू झाला. ब्रेक न लागल्याने दुचाकीच्या मागे बसलेली सुचंद्र खाली पडली. मागून येणाऱ्या एका ट्रकने तिला चिरडले. अपघात झालेला ट्र्कला पकडलं असून त्या चालकाला अटक करण्यात आली आहे. गेल्या नोव्हेंबरमध्ये ‘गौरी इलो’ या मालिकेत सुचंद्रा सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत झळकली होती.

News18लोकमत
News18लोकमत

या मालिकेतून सुचंद्रा दासगुप्ता घराघरात पोहोचली होती. मालिकेतील तिच्या भूमिकेला प्रचंड प्रेम मिळालं होतं. अभिनेत्रीचा विशेष चाहतर्ग तयार झाला होता. अभिनेत्रीच्या अशा अपघाती मृत्यूने बंगली इंडस्ट्रीतील सेलिब्रेटींसह चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. सुचंद्रापूर्वी प्रसिद्ध युट्युबर अमित मंडल याचसुद्धा अशाच एका भयानक अपघातात निधन झालं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात