मुंबई, 12 एप्रिल- हरयाणवी डान्सर (Haryanvi Dancer Sapna Choudhary) सपना चौधरी चांगलीच लोकप्रिय आहे. सपनाचा आणि तिच्या डान्सचा मोठा चाहतावर्ग आहे. गावांगावांमध्ये सपनाचे चाहते तिच्या डान्सच्या कार्यक्रमाची वाट बघत असतात. त्यामुळे सपनाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video On Social Media) होत असतात. सपना बिग बॉस 11 मध्ये स्पर्धक होती. सपना चौधरी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती फोटोज आणि ट्रेंडिंग रील्स (Trending Reels) नेहमी चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर करत असते. आज प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेल्या सपनाने अगदी छोट्या स्टेज शोपासून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. अगदी शून्यापासून सुरुवात करून ‘हरयाणवी क्वीन’ बनण्यापर्यंत सपना चौधरीने (Sapna Choudhary Profile) खूप मेहनत करून मोठा पल्ला गाठला आहे. एकेकाळी ती एक स्टेज शो करून केवळ 3100 रुपये कमवत होती. तिच सपना आज काही तासांत लाखो रुपये कमावते. पाहूयात तिच्या संघर्षाची कहाणी. एका रिपोर्टनुसार, स्टेज परफॉर्मन्ससाठी सपना चौधरी 25 लाख रुपये आकारते. जर ती फक्त 2-3 तासांसाठी एखादा कार्यक्रम करत असेल तर तीन लाख रुपये घेते. तर, यापूर्वी एका मुलाखतीदरम्यान सपनाने तिच्या फीबद्दलही सांगितलं होतं. सपनाचं आयुष्य बऱ्याच संघर्षांनी भरलेलं राहिलंय. तिचं वडील वारल्यानंतर लहान वयातच सपनाच्या खांद्यावर कुटुंबाची जबाबदारी आली; पण तिने हार मानली नाही आणि मेहनत करत जबाबदाऱ्या पार पाडत राहिली. या संदर्भात आज तकने वृत्त दिलंय. करिअरच्या सुरुवातीच्या काळात सपना चौधरीला लोकांचे खूप टोमणे ऐकावे लागले. कुणी तिला डान्सर म्हणायचं, तर कुणी तिच्या चारित्र्याबद्दल प्रश्न उपस्थित करायचं. हे सर्व ऐकून सपनाला वाईट वाटायचे, पण दुर्लक्ष करत ती डान्स करत राहिली. कारण शेवटी तिच्यासाठी तिचं कुटुंब महत्वाचं होतं. केवळ जबाबदारीपोटी डान्स करणाऱ्या सपनाला कालांतराने डान्स आवडू लागला आणि त्यात ती रमू लागली. पुढे याची प्रचिती अशी झाली की तिचा डान्स तिची ओळख बनला. आज सपनाचे जगभरात चाहते आहेत. अनेक राज्यांमध्ये मोठमोठ्या कार्यक्रमांत सपनाचा डान्स पाहायला मिळतो.
अलीकडेच सपना चौधरीचं बदमाशी गाणं रिलीज झालंय. प्रेक्षकांना हे गाणं खूप आवडत असल्याचं दिसतंय. इव्हेंट्स, म्युझिक व्हिडिओंसोबतच सपना चौधरी सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. ती तिच्या आयुष्यातील प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिचे इन्स्टाग्रामवर 4.8 मिलियन फॉलोअर्स असून, तिच्या प्रत्येक पोस्टवर लाइक्सचा पाऊस पडतो.

)







