जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / पहचान कौन? मास्क आणि गॉगल घालून ‘या’ मराठमोळया अभिनेत्याने केला बसमधून प्रवास

पहचान कौन? मास्क आणि गॉगल घालून ‘या’ मराठमोळया अभिनेत्याने केला बसमधून प्रवास

पहचान कौन? मास्क आणि गॉगल घालून ‘या’ मराठमोळया अभिनेत्याने केला बसमधून प्रवास

सध्या या मराठमोळ्या अभिनेत्याचा (Santosh Juvekar ) हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये त्याला ओळखणे अवघड झाले आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 05 ऑक्टोबर ; सध्या मास्कमुळे ओलखणे थोडं मुश्किल झालं आहे असंच म्हणाव लागलेल. एका मराठमोळ्या अभिनेत्याने याच मास्कचा वापर करत गोव्याती पब्लिक ट्रांन्सपोर्टचा आनंद घेतला आहे. प्रसिद्धीच्या झोतात असल्यावर अनेकदा कलाकार मंडळींना सामान्य आयुष्याला राम राम करावा लागतो. म्हणून तर या सगळ्यापासून लांब जाऊन अनेकदा ही कलाकार मंडळी सर्वसामान्य आयुष्य जगत असते. सध्या या मराठमोळ्या अभिनेत्याचा (Santosh Juvekar ) हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये त्याला ओळखणे अवघड झाले आहे. हा अभिनेता संतोष जुवेकर आहे. संतोष सध्या गोव्यात आहे. तिथून त्याने व्हिडियो शेअर केला आहे. त्यात तो बसने प्रवास करताना दिसतो आहे. आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तो म्हणतो, ‘Air bus ️to road bus….. म्हणून म्हणतो माणसाने जमिनीवर रहावं फार हवेत उडू नये. तसं माझं मस्त चालय कितीही हवेत उडलो तरी खुट्टी जमिनीलाच ठोकलीये आपली बरं ते जाऊदे ह्या गाण्यात मधेच कुठे तरी शिंदे असं आयकायला येतं म्हणजे हे गाणं माझ्या झेंडा film मधल्या संत्या शिंदेवर(संत्याभाई वर)आहेका?’..असा प्रश्न देखील संतोषने यामध्ये विचारला आहे.

जाहिरात

दुसऱ्या व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की,आता सांग माका तू हांय असा? हंव जमिनीच्या स्वर्गात अंसा!! या व्हिडिओमध्ये संतोषच्या तोंडाला मास्क दिसत आहे. सोबतच डोळ्याला काळा गॉगल देखील दिसत आहे. यामुळे संतोष ओळखता येत नाही. वाचा :पुणेकरांचं ‘या’ गोष्टीसोबत खास नातं; सुव्रत जोशीने केली भलीमोठी पोस्ट संतोषच्या या व्हिडिओवर काही चाह्त्यांनी भन्नट कमेंट देखील केल्या आहेत. एका नेटकऱ्यांने म्हटले आहे की, भाई गोव्यावरून एक खंबा आण तसेच पैसे फोन पे करतो असे देखील म्हटले आहे. अशा अनेक कमेंट संतोषच्या या व्हिडिओला आल्या आहेत.

संतोष जुवेकरने आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत. संतोष जुवेकर सोशल मीडियावरही बराच सक्रीय आहे. या माध्यमातून तो आपल्या फॅन्सशी जोडला गेला आहे. त्यांच्याशी तो सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्सशी संवाद साधतो, स्वतःचे फोटो आणि सिनेमाची माहिती तसंच व्हिडीओ तो शेअर करत असतो. वाचा : VIDEO - नऊवारी साडीत Bend over; मराठमोळ्या लूकमध्ये रूचिरा जाधवचे इंग्रजी गाण्यावर ठुमके संतोष जुवेकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, काही दिवसांपूर्वीच संतोषचा ‘हिडन’ चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT Platform) प्रदर्शित झाला. या चित्रपटात संतोष जुवेकरने पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. संतोष जुवेकरने ‘झेंडा’, ‘मोरया’, ‘एक तारा’ आणि ‘रेगे’ या मराठी चित्रपटांमध्ये (Marati Movie) दमदार भूमिका साकारल्या. त्याच्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडूनही खूप चांगली पसंती मिळाली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात