Home /News /entertainment /

सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या स्पर्धकांनी घेतली मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट

सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या स्पर्धकांनी घेतली मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट

नुकताच लिटिल चॅम्पच्या या टीमने राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. हे फोटो सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.

    मुंबई, 1 डिसेंबर-   मराठीतील प्रचंड लोकप्रिय रिऍलिटी शो सारेगमपा लिटिल चॅम्पच्या   (Sa re ga ma pa Littile Champ)  स्पर्धकांना नुकताच एक खास संधी मिळाली होती. ती म्हणजे मनसे प्रमुख राज ठाकरे   (Raj Thackeray)  यांना भेटण्याची. नुकताच लिटिल चॅम्पच्या या टीमने राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. हे फोटो सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. सध्या मराठी रिऍलिटी शोचं वारं वाहात आहे. एकापाठोपाठ एक नवीन शो एन्ट्री घेत आहेत. तर काही जुने शो आता आपल्या शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचले आहेत. असाच एक प्रचंड लोकप्रिय झालेला शो म्हणजे 'सारेगमपा लिटिल चॅम्प' होय. पंचरत्नांचं योग्य मार्गदर्शन, मृण्मयी देशपांडेचं खुमासदार सूत्रसंचालन आणि १४ लिटिल चॅम्प्सचे धमाकेदार परफॉर्मन्सेस यामुळे सारेगमप लिटिल चॅम्प्सच हे नवीन पर्व प्रचंड गाजलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि अगदी सुरुवातीपासूनच प्रेक्षकांनी या पर्वाला पसंती दर्शवली. या १४ स्पर्धकांचा प्रवास प्रेक्षकांनी पाहिला. या १४ अप्रतिम गाणाऱ्या स्पर्धकांमध्ये कोण वरचढ आहे हा निर्णय घेणं पंचरत्नांसाठी सुद्धा कठीण होतं. ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली असून, पलाक्षी दीक्षित, ओंकार कानेटकर, गौरी गोसावी, प्रज्योत गुंडाळे, सारंग भालके, रीत नारंग आणि स्वरा जोशी हे सात स्पर्धक महाअंतिम सोहळ्यात एकमेकांशी स्पर्धा करणार आहेत. हे सातही स्पर्धक प्रेक्षकांचे लाडके आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये कोण विजेता ठरणार हे सांगणं खूपच अवघड आहे. महाअंतिम सोहोळ्याआधी या ७ ही जणांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. हे स्पर्धक राज ठाकरेंना भेटून खूप भारावून गेले होते. राज ठाकरेंनी या मुलांना इलेक्ट्रिक तानपुरा आणि तबला भेट दिला. यावेळी राज ठाकरेंनी त्यांच्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Entertainment, Raj thackarey, Zee Marathi

    पुढील बातम्या