मुंबई, 6 ऑगस्ट: आपल्या हास्यानं आणि सौंदर्यानं सगळ्यांना वेड लावणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे संस्कृती बालगुडे(Sanskruti Balgude). संस्कृतीनं तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ती सतत सोशल मीडियावर चर्चेत असते. हटके फोटो आणि व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांसोबत कनेक्ट राहते. अशातच संस्कृती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. संस्कृतीचा नवा व्हिडीओ समोर आला असून यामुळे ती चर्चेचा विषय ठरत आहे. संस्कृती बालगुडेनं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक नवीन व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिचे मित्र-मैत्रिणीही पहायला मिळतायेत. संस्कृतीनं मित्र-मैत्रिंणींसोबत पूलमध्ये डान्स करातानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती मस्त धमाल मस्तीच्या मूडमध्ये दिसतेय. तिच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केलेला पहायला मिळत आहे. हेही वाचा - GHKPM : दीरानं केली भाऊजयीची डिलिव्हरी; प्रेक्षकांनी व्यक्त केला संताप, म्हणाले…. ‘भारी, मस्त, क्युट, मस्त एन्जॉय सुरुये, संपला की विषय, एक नंबर, क्रेझी गॅंग, कूल’, अशा अनेक प्रकारच्या भन्नाट कमेंट व्हिडीओवर येत आहेत. संस्कृतीचा हा व्हिडीओ चाहते शेअरही करत आहे. संस्कृतीचा हा कूल मूड चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे.
दरम्यान, संस्कृती ही शिव्या, रे राया आणि लग्न मुबारक या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली. याशिवाय ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते. संस्कृती नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करताना दिसते. नवनवीन आणि निरनिराळे फोटोशूट संस्कृती करताना पहायला मिळते.